जेव्हा बिडिंग सुरू झाली तेव्हा मला...
14.20 कोटींची बोली लागल्यानंतर कार्तिकला अश्रू अनावर झाले. आज पहिल्यांदा माझ्यावर बोली लागली. मला आनंद तर होतोय. मला इतका आनंद झाला की, मला रडायला आलं. जेव्हा बिडिंग सुरू झाली तेव्हा मला भीती वाटत होती की, मी अनसोल्ड तर जाणार नाही ना... पण बिडिंग सुरू झाली अन् मला रडायला आलं. सगळे नाचत होते पण माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं, असं कार्तिक शर्मा म्हणाला.
advertisement
मला आज इतका आनंद होतोय की...
माही भाईसोबत मी पहिल्यांदा खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीसोबत खेळणं माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या कुटूंबातून पहिल्यांदा असं कुणीतरी मोठ्या स्टेजवर खेळणार आहे. त्यामुळे घरातले सगळेच आनंदी आहेत. मला आज इतका आनंद होतोय की, काही शब्दच नाहीयेत बोलायला, असंही कार्तिक शर्मा म्हणाला.
मालती चहरची कार्तिकसाठी पोस्ट
दरम्यान, माझ्या या प्रवासात माझे आई-वडील, चहार सर, तिवारी सर यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे मला आज खूप आनंद झालाय, असं कार्तिक शर्माने म्हटलं आहे. कार्तिक शर्मा हा चहर क्रिकेट अकादमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे. त्यामुळे दीपक चहरची बहिण आणि अभिनेत्री मालती चहरने देखील त्याच्यासाठी पोस्ट केली.
