आयपीएलनंतर मारण कुटुंबात सूरू असलेल्या वादामुळे काव्या मारणला धक्का बसणार आहे.काव्याचे वडील आणि दक्षिण भारतातील मोठ्या मीडिया कंपनी सन नेटवर्कचे मालक कलानिधी मारन यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. हा मुद्दा तिचा भाऊ आणि माजी खासदार दयानिधी मारन यांनी उपस्थित केला आहे.
खरा वाद सन नेटवर्कमधील शेअरहोल्डिंगबद्दल आहे.2003 पुर्वी मारन कुटुंब आणि करुणानिधी कुटुंबाचा या कंपनीत समान हिस्सा होता, परंतु 2003 नंतर परिस्थिती बदलली. सन डायरेक्ट टीव्ही, सन पिक्चर्स, एफएम चॅनेल आणि अगदी आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) सारख्या कंपन्या कंपनीच्या निधीचा गैरवापर करून स्थापन केल्याचा आरोप आहे.
advertisement
आता जर न्यायालयाने (2003 चा) जुना शेअर पॅटर्न पुनर्संचयित करण्याचा निर्णय दिला, तर सन नेटवर्कच्या मालकीमध्ये बदल होऊ शकतो. याचा परिणाम आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादवरही होऊ शकतो.
अशा परिस्थितीत, बीसीसीआयला हस्तक्षेप करून निर्णय घ्यावा लागू शकतो आणि सन टीव्हीला संघ विकावा लागू शकतो. जर असे झाले तर आयपीएलमधील प्रत्येक सामन्यात दिसणारी काव्या मारन पुढच्या वेळी संघाची मालकीण राहणार नाही. जर हा वाद लवकर सोडवला गेला नाही तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ते एक दुःस्वप्न ठरू शकते.
हैदराबादसाठी कसा होता आयपीएलचा हंगाम
सनरायझर्स हैदराबादची आयपीएल 2025 मध्ये कामगिरी खूपच खराब होती. एकूण 14 आयपीएल सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद 6 विजय,7 पराभव आणि एका अनिर्णीत सामन्यासह सहाव्या स्थानावर राहिले. काव्या मारनने या हंगामासाठी हेनरिक क्लासेन (23कोटी), पॅट कमिन्स (18कोटी), ट्रॅव्हिस हेड (14कोटी), अभिषेक शर्मा (14कोटी), नितीश कुमार रेड्डी (6 कोटी) यांना कायम ठेवले होते. परंतु 2023 च्या तुलनेत या खेळाडूंची कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षेनुसार नव्हती.