सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना फक्त ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या केकेआरने हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात 10.3 षटकात पूर्ण केलं. हैदराबादचे फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक २४ धावा केल्या. काव्या मारनचा ७ सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ती सर्वांना बाय बाय करत बाहेर जाताना दिसते. काव्या मारन स्टेडियममधून बाहेर जात होती तेव्हा केकेआरच्या १ बाद ६६ धावा झाल्या होत्या. त्यावेळी व्यंकटेश अय्यर आणि रहमनुल्लाह गुरबार खेळपट्टीवर होते.
advertisement
सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कमिन्सच्या या निर्णयाचा फटका सनरायजर्स हैदराबादला बसला. चेपॉकमध्ये एक दिवस आधी पाऊस झाला होता. त्यामुळे केकेआरच्या वेगवान गोलंदाजांचे चेंडू स्विंग होत होते. केकेआरच्या वेगवान माऱ्यासमोर सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी गडगडली. त्यांचा संघ फक्त ११३ धावाच करू शकला.
हैदराबादच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर गोलंदाजांनीही मोठी निराशा केली. पॅट कमिन्सने सुरुवातीला विकेट घेत आशा निर्माण केल्या होत्या. पण त्यानंतर हैदराबादला केकेआरचे फलंदाज बाद करता आले नाहीत. पॅट कमिन्सशिवाय शहबाज अहमदने एक विकेट घेतली.