आयपीएलमध्ये पार पडणाऱ्या हैदराबादच्या प्रत्येक सामन्यात मालकिण काव्या मारनची उपस्थित असते.असा एकही सामना पार पडला नाही,ज्यामध्ये त्या दिसल्या आहेत.आपल्या संघाच मनोध्यर्य वाढवण्यासाठी त्या नेहमीच स्टेडिअममध्ये उपस्थित असतात. यावेळी स्टेडिअमवर सेलीब्रेशन करताना किंवा विकेट पडताना त्यांच्या रीअॅक्शन नेहमी सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.
काव्या मारनच्या स्टेडिअममधील काही रिअॅक्शनवर मीम्स देखील बनतात.त्यामुळे या व्हायरल मीम्स आणि रिअॅक्शनवर पहिल्याच काव्या मारन बोलल्या आहेत. माझं खेळाप्रती असलेले प्रेम कॅमेरामॅनला माझ्यापर्यंत पोहोचवते असे काव्या मारन सांगते.
advertisement
तुम्ही ज्या गोष्टी पाहत आहात, तीच माझी भावना आहे. कारण माझ्या नोकरीने मला अशा स्थितीत आणले आहे की मला स्वतःला सर्वांसमोर ठेवावे लागते.मी हैदराबादमध्ये काहीही करू शकत नाही.मला तिथेच बसावे लागते.ती एकमात्र जागा आहे जिथे मी बसू शकते.पण जेव्हा मी अहमदाबाद किंवा चेन्नईला जाते आणि मी काही फूट अंतरावर कुठेतरी एका बॉक्समध्ये बसलेली असते तेव्हाही कॅमेरामन मला शोधतो.त्यामुळे, ते मीम कसे बनते हे मला समजते,असे काव्या सांगते.
काव्या मारन इनसाइड स्पोर्ट्सला सांगते की,सनरायझर्सचा विचार केला तर मी खरोखर माझ्या मनाचे ऐकते. मला वाटते जेव्हा तुम्ही तुमचे मन आणि आत्मा एखाद्या गोष्टीत घालता तेव्हा तुम्हाला स्वाभाविकच त्याच्या यश आणि अपयशांबद्दल खूप प्रेम होते.
दरम्यान यंदाच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडे अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड,ईशान किशन, हेनरीक क्लासेन, पॅट कमिन्स अशा खेळाडूंचा फौजफाटा असताना देखील आणि या खेळाडूंवर कोट्यावधी पैसे खर्च केले असताना देखील संघाच्या वाट्याचा पराभव आला होता.