सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणने आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी नवीन बॉलिंग कोचची घोषणा केली आहे. आयपीएलच्या 2026 च्या हंगामासाठी काव्या मारणने 35 वर्षीय वेगवान गोलंदाज वरूण आरोनला सनरायझर्स हैदराबादचा बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता वरूण आरोन पुढच्या हंगामात जेम्स फ्रॅकलीनची जागा घेईल.
हैदराबादने आयपीएल 2025 च्या हंगामासाठी जेम्स फ्रॅकलीनला डेल स्टेनच्या जागी बॉलिंग कोच बनवले होते.पण आता एकच सीझननंतर ते बाहेर झाले आहेत. आता त्यांचा जागा वरूण आरोन घेणार आहे. वरूण आरोनने भारतासाठी 9 टेस्ट आणि 9 वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट ए आणि टी20 मिळुन त्याने 407 विकेट घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडचा माजी खेळाडू जेम्स फ्रॅकलीने आपल्या क्रिकेटींग करिअरमध्ये 820 विकेट घेतले आहेत.
दरम्यान यंदाच्या हंगामात हैदराबाद काही खास कामगिरी करू शकली नव्हती. हैदराबादने लिलावात प्रचंड पैसा ओतून अनेक प्रतिभावंत खेळाडूंना संघात घेतलं होतं. पण हे खेळाडू फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही. आणि हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. हैदराबाद संघ या हंगामात पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर राहिला होता.