संजू सॅमसनला टीममध्ये घेण्यासाठी केकेआरने 21 वर्षांचा बॅटर अंगरिक्ष रघुवंशी आणि ऑलराऊंडर रमणदीप सिंग हे खेळाडू ऑफर केले आहेत. या दोनपैकी एक खेळाडूला सोडण्यासाठी केकेआर तयार आहे. आता केकेआरची ही ऑफर राजस्थान स्वीकारणार का? यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत.
कसं होतं खेळाडूंचं ट्रेड?
आयपीएल 2009 पासून खेळाडूंना ट्रेड करण्याचा नियम आहे, पण मागच्या काही वर्षांमध्ये स्पर्धा तीव्र होत असल्यामुळे टीम खेळाडूंना ट्रेड करत आहेत. आयपीएल नियमानुसार फ्रॅन्चायजीना खेळाडूंना दोन प्रकारे ट्रेड करता येतं. खेळाडूला टीममध्ये घ्यायचं असेल तर फ्रॅन्चायजीला एक तर कॅश डील करावं लागतं, नाहीतर त्यांना टीममध्ये असलेले खेळाडू समोरच्या फ्रॅन्चायजीला द्यावे लागतात, यानंतर ट्रेड झालेल्या खेळाडूंचे पैसे ऍडजस्ट केले जातात.
advertisement
आयपीएल 2023 आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी गुजरात टायटन्ससोबत कॅश डील केलं होतं. पण संजू सॅमसनची डील आयपीएलच्या दुसऱ्या नियमात बसेल. राजस्थानने संजू सॅमसनला 18 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. तर केकेआरकडे असलेले अंगरिक्ष रघुवंशी 3 कोटी आणि रमणदीप सिंग 4 कोटी रुपयांचे खेळाडू आहेत. आता केकेआरने यातला एकच खेळाडू दिला, तर त्यांना राजस्थानला 15 किंवा 14 कोटी रुपये द्यावे लागू शकतात.
राजस्थानची सीएसकेला ऑफर
दुसरीकडे राजस्थानने सीएसकेला संजू सॅमसनच्या बदल्यात ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा किंवा शिवम दुबे यांच्यापैकी एक खेळाडू द्यायची मागणी केली आहे, पण सीएसके यासाठी तयार नसल्याचं बोललं जात आहे.
केकेआरचे प्रॉब्लेम सुटणार
संजू सॅमसन केकेआरकडे गेला तर शाहरुखच्या टीमच्या ओपनर, विकेट कीपर आणि कर्णधाराच्या अडचणी संपणार आहेत. आयपीएलच्या या मोसमात अजिंक्य रहाणेने केकेआरचं नेतृत्व केलं, पण त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. तसंच मागच्या बऱ्याच काळापासून केकेआर चांगल्या विकेट कीपरच्याही शोधात आहे. संजू सॅमसन टीममध्ये आला तर केकेआरला कॅप्टन आणि विकेट कीपरही मिळेल.