केकेआरचा स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यर लग्नबंधनात अडकला. आयुष्याच्या नव्या इनिंगला त्याने सुरुवात केली. व्यंकटेशची पत्नी श्रुती ही बंगळुरूतील लाइफस्टाइल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करते. दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. व्यंकटेशची पत्नी श्रुतीने फॅशन मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री केलीय.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये श्रुतीसोबत व्यंकटेशचा साखरपुडा झाला होता. रविवारी २ जून रोजी दोघांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले. व्यंकटेश आणि श्रुती यांनी कुटुंबियांसह जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक रितीरिवाजानुसार लग्न केलं.
T20 World Cup : धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने केला विक्रम, टी20 वर्ल्ड कपमध्ये कमाल
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेल्या व्यकंटेश अय्यरने २०२१ मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. केकेआरकडून धावांचा पाऊस पाडल्यानंतर त्याला टीम इंडियात संधी मिळाली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध जयपूर इथं झालेल्या सामन्यातून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जानेवारी २०२२ मध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. भारताकडून दोन वनडे आणि ९ टी२० मध्ये तो खेळला आहे.