केएल राहुल 100 धावा करून बाद
केएल राहुलच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) एका अनोख्या आणि नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी मॅचमध्ये (Test Match) बरोबर 100 धावांवर दोनदा बाद होणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात केएल राहुल 100 धावा करून बाद झाला. तर त्याआधी याच वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटीमध्ये देखील केएल राहुल 177 बॉलमध्ये 100 वर खेळत असताना आऊट झाला होता.
advertisement
लकी म्हणावा की अनलकी?
केएल राहुलच्या या विक्रमामुळे, 100 धावांचा टप्पा पार करताच लगेच आपली विकेट गमावणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. शतक पूर्ण झाल्यावर लगेच बाद होणं हा कोणत्याही बॅटरसाठी नकोसा रेकॉर्ड असतो, मात्र हा आकडा केएल राहुलच्या नावासमोर दोनदा जमा झाला आहे. त्यामुळे केएल राहुलसाठी 100 आकडा लकी म्हणावा की अनलकी, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
तीन फलंदाजांची शतकं
दरम्यान, अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी मॅचचा (Test Match) दुसरा दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 बाद 448 धावा करत वेस्ट इंडिजच्या 162 धावांवर 286 धावांची मोठी आघाडी घेतली. टीम इंडियासाठी दुसऱ्या दिवशी तब्बल तीन फलंदाजांनी शतकं झळकावली.