Kl Rahul News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज के एल राहुल सध्या विश्रांती घेतोय आणि मुलाखती घेतोय. अशाच एका मुलाखतीत के एल राहुलने एका दिग्गज खेळाडूची तक्रार त्याच्या बायकोकडे केली आहे. 'तुझ्या नवऱ्याला सांग, तो खूप वाईट वागतो' अशा शब्दात केएल राहुलने त्याच्या बायकोकडे तक्रार केली होती. त्यामुळे केएल राहुलने अशाप्रकारे तक्रार का केली आहे? या तक्रारी मागे कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर इंग्लंड दौऱ्यावर असताना इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटून केविन पीटरसनने केएल राहुलला डिनरसाठी आमंत्रित केले होते. या डिनर दरम्यान केएल राहुलने केविनची बायको जेसिकाकडे काही तक्रारी केल्या होत्या? या तक्रारीचा उलगडा के एल राहुलने 2 स्लॉग युट्यूबर्स या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केल्या आहेत.
' त्यांनी (केविन पीटरसनने) मला जेवणासाठी आमंत्रित केले होते.त्यावेळी आम्ही यूकेमध्ये असताना मी त्यांच्या पत्नीकडे तक्रार केली. ‘तुमच्या पतीला माझ्यासोबत शांतपणे वागायला सांगा, तो माझ्याशी खूप वाईट वागतो, अशी तक्रार केल्याचे केएल राहुल सांगतो.
खरं तर केएल राहुल आणि केविन पीटरसन हे दोघेही यावर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होते. राहुल लखनऊमधून दिल्लीत आला तर त्याचं संघात पीटरसनने मेंटॉरची जबाबदारी स्विकारली होती. या दरम्यान दोघांची घट्ट मैत्री झाली त्यानंतर दोन्ही क्रिकेटपटू त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी आणि एकमेकांवर हलक्याफुलक्या टीका करण्यासाठी ओळखले जाऊ लागले.
या मुलाखतीत राहुलने आठवले की त्याची बायको अभिनेत्री अथिया शेट्टी हिने दिल्ली कॅपिटल्सच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केलेल्या पीटरसनसोबतच्या त्याच्या काही विनोदी क्लिप्स पाहिल्यानंतर त्याला कसे फटकारले होते. यावर तो म्हणाला, "आमची विनोद वेगळी आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे असे राहुल हसत म्हणाला. “हा व्हिडिओ होता, आणि दोन-तीन वेळा मी काहीतरी बोललो आणि डीसीने तो इंस्टाग्रामवर पोस्ट केला. तर, माझी पत्नी मला म्हणत होती, ‘तू इतका वाईट का वागतोस? तो इतका गोड माणूस आहे.
दरम्यान के एल राहुल सध्या विश्रांती घेतोय आणि टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळते आहे. या मालिकेनंतर भारताचा सामना हा साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. या मालिकेत पुन्हा के एल राहुल मैदानात दिसणार आहे.
