71 व्या ओव्हरनंतर काय घडलं?
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटांत, भारतीय खेळाडूंना जेवणाची वेळ झाली आहे असं समजून ते मैदान सोडू लागले, परंतु पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी त्यांना मैदानात थांबण्यास सांगितलं. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाच्या 71 व्या ओव्हरनंतर हा प्रकार घडला. भारतीय खेळाडूंनी चुकून पहिले सत्र संपले असे गृहीत धरले आणि ते ड्रेसिंग रूमकडे निघाले. पण खरी खोड टीम इंडियाच्या एका खेळाडूने काढली होती.
advertisement
केएल राहुलने जाता जाता बेल्स पाडल्या
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून केएल राहुल होता. केएल राहुलने जाता जाता बेल्स पाडल्या. त्यामुळे सर्वांचा समज झाला की, अंपायर्सने लंच टाईम घोषित केलाय. पंच रिचर्ड इलिंगवर्थ नॉन-स्ट्रायकर एंडवर त्यांची जागा घेणार होते. त्यांनी ताबडतोब खेळाडूंना परत बोलावले, ज्यामुळे मैदानावर गोंधळ निर्माण झाला. राहुलने विकेटजवळून जाताना हळूवारपणे हाताने बेल्स काढून टाकले. त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे गोंधळ उडाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने भारताकडून एक ओव्हर टाकली.
पाहा Video
तिसऱ्या दिवसाचा खेळ
दरम्यान, तिसऱ्या दिवशी भारताने पहिल्या इनिंगमध्ये वेस्ट इंडीजला 248 रन्सवर ऑलआऊट करून 270 रन्सची मोठी लीड घेतली, ज्यात कुलदीप यादवने आपल्या कसोटी करियरमधील पाँचवा फाइव्ह विकेट हॉल (5/82) पूर्ण करत इंग्लंडचे जॉनी वार्डल यांच्या विक्रमाची बरोबरी केली. दिवसाची सुरुवात वेस्ट इंडीजने 140/4 या स्कोरवरून केली, पण कुलदीपच्या जादुई बॉलिंगमुळे त्यांची इनिंग लवकरच संपुष्टात आली आणि भारताने त्यांना फॉलोऑन दिला. मात्र, फॉलोऑननंतर वेस्ट इंडीजच्या बॅटर्सनी जोरदार प्रतिकार केला. जॉन कॅम्पबेल (87 रन्स) आणि शाई होप (66 रन्स नॉटआऊट) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 138 रन्सची अभेद्य पार्टनरशिप करत दिवसअखेरीस वेस्ट इंडीजचा स्कोर 173/2 पर्यंत पोहोचवला. या झुंजार खेळीमुळे वेस्ट इंडीज अजूनही भारताच्या लीडपेक्षा 97 रन्सने मागे आहे आणि त्यांनी मॅचमध्ये परत येण्याची आशा कायम ठेवली आहे.