केएल राहुलला वनडे संघातून नारळ?
केएल राहुलने पर्थवर खेळेल्या वनडे सामन्यात 38 धावांची महत्त्वाची आक्रमक इनिंग खेळली होती. तर अॅडिलेटवर त्याने 11 धावा केल्या होत्या. तर तिसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुलला बॅटिंगला देखील येता आलं नाही. अशातच कोणत्याही पोझिशनवर स्वत:ला अॅडजस्ट करणाऱ्या केएल राहुलला आता वनडे संघातून नारळ दिला जाऊ शकतो. केएल राहुलला चांगली खेळी करून देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण काय? समजून घ्या.
advertisement
ऋषभ पंतची टीम इंडियाला गरज
सध्या टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये एकही लेफ्ट हँडल खेळाडू नाही. यशस्वी जयस्वालला खेळवलं असतं पण रोहित आणि विराटमुळे यशस्वीला मैदानात उतरवता येत नाहीये. त्यात आता रोहित आणि विराट यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांना प्लेइंग इलेव्हनमधून हटवणं शक्य नाही. अशातच आता अक्षर पटेलला नंबर चारवर खेळवावं लागतंय. अशातच आता ऋषभ पंतची टीम इंडियाला गरज आहे. जर ऋषभ पंत टीम इंडियामध्ये परतला तर केएल राहुल याला नक्कीच बाहेर बसावं लागेल.
विषय गंभीर तिथं केएल राहुल खंबीर
दरम्यान, दरम्यान, जिथं विषय गंभीर तिथं केएल राहुल खंबीर, अशी म्हणत तयार करावी लागेल. टीम इंडियामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल तिथं केएल राहुल खेळतो. कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून वनडे संघात मिडल ऑर्डर खेळाडू म्हणून तर टी-ट्वेंटीमध्ये टॉप ऑर्डरमध्ये खेळतो. त्यामुळे केएल राहुलला गंभीर खेळणं समजतो का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
