लखनऊ : सध्या देशात आयपीएल स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे क्रिकेट रसिक अत्यंत उत्साहात आहेत. त्यातच लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत असलेला फिरकीपटू एम सिद्धार्थने पदार्पणाच्या मोसमात पहिलीच विकेट जगप्रसिद्ध महान खेळाडू विराट कोहलीची घेतली. यामुळे फिरकीपटू एम सिद्धार्थ सध्या चर्चेत आला आहे.
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने सिद्धार्थला सामन्यातील पहिले षटक टाकायला सांगितले होते. यावेळी 25 वर्षांच्या या गोलंदाजाने आपल्या पहिल्याच षटकात सर्वांना प्रभावित केले. त्याने आपल्या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीने कोहलीसारखा दिग्गज आणि डुप्लेसिससारख्या बलाढ्य फलंदाजांना बांधून ठेवले.
advertisement
सिद्धार्थने या सामन्याआधी संघाचे हेड कोच जस्टिन लँगर यांना एक वचन दिले होते, ते त्याने पूर्ण केले. सतत चर्चेत असलेल्या या युवा खेळाडूचा आदर्श भारतीय खेळाडूच आहे. शुक्रवारी त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, त्याचा आदर्श माजी भारती गोलंदाज इरफान पठाण आहे. तसेच त्याला इरफान पठाण सारखे बनायचे आहे. तो त्यालाच आपले आदर्श मानतो. तसेच भविष्यात त्याच्यासाखीच कामगिरी करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
गरीबांच्या पोरांसाठी आशेचा किरण, बेटी पाठशाळेच्या माध्यमातून जेवणही मिळतं फ्री, कुठे भरते ही शाळा
सिद्धार्थने सांगितले की, जेव्हा त्याला विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी कोचने सांगितले तेव्हा त्याचावर कोणताच दबाव नव्हता. फक्त आपल्या संघाला सामना जिंकून देण्याचे त्याचे प्रयत्न होते. जेव्हा विराट कोहलीची विकेट घेतली तेव्हा असे वाटले की, आयुष्यात असा अनुभव याआधी कधीच आला नाही. त्यावेळी खूप आनंद झाला होता. तसेच संघालाही त्याच्यावर खूप गर्व झाला.
क्रिकेटची सुरुवात कशी झाली -
सिद्धार्थने सांगितले की, जेव्हा तो 7 वर्षांचा होता, तेव्हापासून त्याने आपल्या वडिलांना क्रिकेट खेळताना पाहिले आहे. त्याच्या वडिलांना क्रिकेटमध्ये रस होता. चेन्नईमध्ये त्याचा जन्म झाला आहे. त्याची क्रिकेटमध्ये अशाप्रकारे रुची वाढली आणि आज तो आयपीएलच्या संघाचा सदस्य झाला. संघाला विजय मिळवून देणे हेच माझे लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले.