अभिषेक शर्माला केकेआरमध्ये प्रमोशन
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, नायर यांना गेल्या आठवड्यात फ्रँचायझीच्या निर्णयाची माहिती देण्यात आली होती आणि लवकरच याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. नायर गेल्या वर्षी देखील केकेआर संघाचा भाग होता, जिथं त्याने सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून काम केलं होतं. अशातच आता त्याला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
कोचिंग सेटअपचा भाग
अभिषेक नायर केकेआर टीमच्या कोचिंग सेटअपचा भाग होता. तो युवा खेळाडूंचे मार्गदर्शन आणि विकास करण्यासाठी ओळखला जातो. रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर आणि अंगक्रिश रघुवंशी यांसारख्या भारतीय युवा खेळाडूंना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी अभिषेकने मोठं काम केलं होतं.
टीम इंडियाचा असिस्टंट कोच
जुलै 2024 मध्ये अभिषेकची भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे असिस्टंट कोच म्हणून निवड झाली. श्रीलंका दौऱ्यातून त्याने टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियाने मोठे बदल केले. त्यात अभिषेकला काढून टाकण्यात आलं होतं.
हेड कोच म्हणून जबाबदारी
टीम इंडियाचा असिस्टंट कोच म्हणून त्यांचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान टेस्ट फॉर्मेटमध्ये भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर, एप्रिल 2025 मध्ये त्यांना भारतीय टीमच्या कोचिंग स्टाफमधून मुक्त करण्यात आले. मात्र, टीम इंडियातून बाहेर पडल्यानंतर लगेचच आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी त्यांनी पुन्हा केकेआरच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रवेश केला होता. अशातच आता त्याला हेड कोच म्हणून जबाबदारी दिली गेल्याची माहिती समोर आली आहे.
