कुलदीप एवढा कॉन्फिडेन्ट होता की...
झालं असं की, ओमानला 189 धावांचं लक्ष दिल्यानंतर टीम इंडिया बॉलिंगला आली पण 8 व्या ओव्हरपर्यंत एकही विकेट पडली नाही. टीम इंडियाच्या बॉलर्सला धार लागत नव्हती. त्यावेळी सूर्याने कुलदीप यादवला बॉलिंगला आणलं. 9 वी ओव्हर कुलदीपच्या हाती दिली. कुलदीपने 9 व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कॅप्टन जतेंद्र सिंगला LBW केलं. त्यावेळी कुलदीप एवढा कॉन्फिडेन्ट होता की, त्याने विकेटकीपरला न विचारता त्याने सूर्याचा हात धरला आणि जबरदस्ती डीआरएस घ्यायला लावला आणि ज्याची भीती होती, तेच झालं. टीम इंडियाने डीआरएस गमावला. त्यानंतर सूर्याने कुलदीपकडे पाहून एक लूक दिला.
advertisement
अखेरच्या बॉलवर पुन्हा LBW ची अपील
पण कुलदीपने लगेच आपली चूक सुधारली अन् जितेंद्र सिंग याला ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर माघारी धाडलं. टीम इंडियाला पहिली विकेट मिळाली. त्यानंतर कुलदीपने आपल्या फिरकीची जादू देखील कायम ठेवली. कुलदीप यादवने ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर पुन्हा LBW ची अपील केली. अंपायरने नॉटआऊट दिलं पण यावेळी आऊट होण्याची शक्यता नसल्याने सुर्याने कुलदीपकडं ढुंकून देखील पाहिलं नाही. त्यानंतर सर्वांना हसू देखील फुटलं.
ओमानच्या फलंदाजांची शानदार कामगिरी
दरम्यान, आशिया कप 2025च्या शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने ओमानचा 21 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 188 धावा केल्या आणि ओमानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ओमानच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी केली पण ते 4 गडी गमावून फक्त 167 धावाच करू शकले.