एशियन गेम्समध्ये कुशाल मल्लाने हा नवा विक्रम केला आहे. कुशलने मंगोलियाविरुद्ध 50 चेंडूत नाबाद 137 धावा केल्या. त्याने 12 सिक्स आणि 8 फोर मारले. मल्लाने सिक्स आणि फोरच्या मदतीने अवघ्या 34 बॉलमध्ये 104 धावा पूर्ण केल्या.
कुशालच्या आधी टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतकाचा विक्रम रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलरच्या नावावर होता. या दोन्ही फलंदाजांनी टी-20मध्ये 35-35 चेंडूत शतके झळकावली होती. रोहितने 2017 मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली होती, तर मिलरने बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. मात्र, कुशलने आता या दोघांनाही मागे टाकलं.
advertisement
चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळच्या क्रिकेट संघाने खळबळ उडवून दिली आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नेपाळ संघाने मंगोलियाविरुद्ध एक-दोन नव्हे तर टी-20 चे तीन मोठे विक्रम मोडून काढले.
या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना नेपाळने 20 ओवरमध्ये 314 धावांचा डोंगर उभा केला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये संघाने 300 पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 मध्ये पहिल्यांदाच सर्वात जास्त धावा केल्यानं या टीमचं कौतुक होत आहे.