उच्चस्तरीय समितीची स्थापना
कोलकाताच्या स्टेडियमवरील ही घटना नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाशी संबंधित असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन यावर सविस्तर तपास करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी ही समिती उपाययोजना देखील सुचवणार आहे.
मी खूप व्यथित झाले... - ममता बॅनर्जी
advertisement
सॉल्ट लेक स्टेडियममध्ये आज झालेल्या गैरव्यवस्थापनामुळे मी खूप व्यथित झाले आणि धक्का बसला आहे. मी हजारो क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांसोबत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियमकडे जात होते, जिथं सर्वजण त्याच्या आवडत्या फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी जमले होते. या दुर्दैवी घटनेबद्दल मी लिओनेल मेस्सी, तसेच सर्व क्रीडाप्रेमी आणि त्यांच्या चाहत्यांची मनापासून माफी मागते, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
चौकशी समिती गठीत
मी न्यायमूर्ती (निवृत्त) असीम कुमार रे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करत आहे, ज्यात मुख्य सचिव आणि गृह आणि पर्वतीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सदस्य असतील. ही समिती या घटनेची सखोल चौकशी करेल, जबाबदारी निश्चित करेल आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचवेल. मी पुन्हा एकदा सर्व क्रीडाप्रेमींची मनापासून माफी मागतो, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
