'बांगाभूषण' पुरस्काराने सन्मानित
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते ऋचाला उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police - DSP) या पदावरील नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यासोबतच तिला 'बांगाभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि सोन्याची साखळीही भेट देण्यात आली. तसेच गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलची प्रतिकृती देऊन गौरव केला. आपल्या कामगिरीमुळे बंगालचे नाव उंचावणाऱ्या या युवा खेळाडूचा हा गौरव क्रिकेट प्रशासकीय संस्था आणि राज्य सरकार दोघांसाठीही अभिमानास्पद क्षण होता.
advertisement
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडन गार्डन्स येथील एका कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे भरभरून कौतुक केलं. या वेळी बोलताना त्यांनी गांगुली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष बनावं, अशी जोरदार मागणी केली.
गांगुली एक दिवस ICC अध्यक्ष होतील - ममता बॅनर्जी
"आम्हाला नेहमी वाटत होते की सौरवने भारतीय टीमचा कॅप्टन बनावं. त्याने देश, जग आणि बंगाल- या तिन्हीसाठी मोठे योगदान दिले आहे," असे सीएम ममता म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, "आता मी सांगेन की सौरव गांगुली ICC अध्यक्ष बनले पाहिजेत. ते सध्या त्या पदावर नसले तरी एक दिवस नक्कीच ICC अध्यक्ष होतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ईडन गार्डन्स नाही 'गोल्डन गार्डन'
ममता बॅनर्जी यांनी ईडन गार्डन्सचे कौतुक करताना म्हटलं की, "हे केवळ ईडन गार्डन्स नसून 'गोल्डन गार्डन' आहे, येथून सोनं बाहेर पडतं." त्यांनी गांगुली यांच्या नेतृत्वाखालील टीमने 2002 च्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून दिली. "मी आजही गांगुलीचा तो जल्लोष विसरू शकत नाही. तो क्षण संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा होता," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
गांगुली बंगालची शान - ममता बॅनर्जी
मुख्यमंत्री बॅनर्जी पुढं म्हणाल्या की, सौरव गांगुली केवळ एक खेळाडू नाही, तर ते बंगालची शान आहेत. "गांगुलीने बंगालचे नाव उंचावले आहे. त्यांनी क्रिकेटमध्ये जे केले, तो एक इतिहास बनला आहे. देशाला अशा आणखी आयकॉनची गरज आहे," असे मत ममता बॅनर्जी यांनी मांडलं.
