अजिंक्य नाईक यांनी 2019 पासून सलग 2 एमसीएच्या एपेक्स कौन्सिल मधील कार्यकाळ पूर्ण केला होता. पण एमसीएच्या नियमानुसार त्यांना कुलिंग ऑफ कालावधी गरजेचा असल्याचा दावा करण्यात आला होता आणि अध्यक्षपदासाठीची त्यांची उमेदवारी अपात्र ठरवण्याची मागणी हायकोर्टात करण्यात आली होती.तसेय या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची माणगी करण्यात आली होती.
पण हायकोर्टाने निवडणूक प्रक्रिया थांबवायला नकार दिला होता.पण आताचा निकाल हा निर्णयास बंधनकारक राहणार असल्याचेही कोर्टाने सांगितले होते. त्यामुळे MCA निवडणूक प्रक्रिया जरी पूर्ण झाली तरी MCA चा निकाल हा हायकोर्टाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून असणार असल्याचे कोर्टानं स्पष्ट केले आहे. तसेच या प्रकरणात कोर्टाने कोणताही स्टे न दिल्यानं,अजिंक्य नाईक यांची आज होणारा विजय निश्चित मानला जात आहे.
advertisement
हायकोर्टाकडे आज संपूर्ण सुनावणी घेण्यास वेळ नव्हता.त्यामुळे युक्तीवादानंतर हायकोर्टाला असे लक्षात आले की, अध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती बिनविरोध पार पडली आहे. आणि 4 वाजता निवडणूक जाहीर होणार आहे.आम्ही सुनावणी घेऊ पण आता काय निर्णय दिला किंवा 8 दिवसांनी जो निर्णय येईल, म्हणजे याचिकेत जो निर्णय येईल, तो एमसीए निवडणूकीसाठी बांधिल असेल,असे हायकोर्टाने कोर्टात सांगितल्याचे सुभाष बाणे (याचिकाकर्ते समीर पेठे यांचे वकील)यांनी सांगितले.
तसेच एमसीए, अजिंक्य नाईक आणि इलेक्शन ऑफिसर यांना हायकोर्टाने 2 आठवड्याची वेळ दिली आहे. या वेळेत त्यांना आपलं म्हणणं मांडायचं आहे.हायकोर्टाने याचिवकेवर पुन्हा 5 डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीत जो निकाल येईल तो एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीला बांधील असे,असे सुभाष बाणे यांनी सांगितले आहे.
अजिंक्य नाईक बिनविरोध
एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी भाजप नेते प्रसाद लाड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विंहग सरनाईक यांनी अर्ज केला होता.पण निवडणूकीच्या दोन दिवस आधीच सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांनी बिनविरोध निवड झाली होती.
