आशिष नेहराचा मुलगा ढसाढसा रडला
गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांचा मुलगा, जो नेहमीच संघाला पाठिंबा देताना दिसतो, तो संघाच्या या पराभवानंतर अत्यंत भावूक झाला. सामना संपल्यानंतर त्याला अक्षरशः रडू कोसळले आणि त्याचे हृदय तुटल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. त्याला इतर लोकांनी समजावण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या टीमने यंदाच्या आयपीएलमधून एक्झिट घेतल्यानंतर आता कुटूंब भावूक झाल्याचं दिसून आलंय.
advertisement
शुभमन गिलच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी
याचवेळी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलची बहीण शहनील गिल देखील प्रचंड निराश झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती रडताना कॅमेऱ्यात कैद झाली. गुजरातच्या पराभवाने तिला खूप दुःख झालं होतं आणि तिलाही इतरांकडून सांत्वन दिलं जात होतं.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला स्पर्धेतून बाहेर काढले असून, आता क्वालिफायर 2 मध्ये त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. क्वालिफायर 2 मधील विजेता संघ अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी (RCB) भिडेल. रोहित शर्माला त्याच्या आक्रमक 81 धावांच्या खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.