एक माकड मैदानावर आला अन्...
एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथं एक माकड मुलांसोबत मैदानावर आला आणि संपूर्ण मैदानात गोंधळ उडवून मैदानावर उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना पळवून लावलं. या माकडाने लहान मुलांना लाथ मारून जखमीही केल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, क्रिकेटच्या मैदानावर खेळणारी मुले माकडाला पाहून घाबरतात आणि इकडं तिकडं पळू लागतात.
advertisement
माकडाने एन्ट्री केली अन् धुमाकूळ
16 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये दिसतंय की, काही मुलं क्रिकेटच्या ग्राऊंडवर नेट्समध्ये प्रॅक्टिस करत होती. त्यावेळी माकडाने एन्ट्री केली अन् धुमाकूळच घातला. माकडाने दोन खेळाडूंच्या पाठीवर हल्ला केला अन् त्यांना तोंडावर पाडलं. त्यानंतर काही बारकाले खळाडू रडत रडत मैदान सोडताना दिसले.
भन्नाट कमेंट्स
दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातल्यानंतर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. पोरं इथं क्रिकेट खेळण्यासाठी आले होते, पण हा खेळ WWE वर संपला, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने युझरला वाटतंय की माकडाला वाटलं असेल इथं कबड्डीचा सामना सुरूये. त्यामुळे तो इथं आला असेल.
