तिलक वर्माची बॅटिंग ऑर्डर
बर्थडे बॉय तिलक वर्मा याने आशिया कपच्या फायनलमध्ये अफलातून कामगिरी करून सर्वांची मनं जिकंली होती. अशातच आता तिलक वर्माचीच बॅटिंग ऑर्डर फिक्स नसल्याचं पहायला मिळत आहे. तिलक वर्माने टीम इंडियासाठी खेळताना तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर 56.68 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या धावा त्याने 148.68 च्या अफलातून स्ट्राईक रेटने कोरल्या आहेत. पण गंभीरने तिलकला खालच्या बॅटिंग ऑर्डरवर पाठवल्याने मोठ्या समस्या निर्माण झाल्यात.
advertisement
तिलक वर्माचा स्ट्राईक रेट
जेव्हा तिलक वर्माला खालच्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं जातं, तेव्हा तिलक वर्माचा स्ट्राईक रेट कमी होतो अन् सरासरी देखील खालावते. टीम इंडियासाठी 5, 6 आणि 7 व्या क्रमांकावर खेळताना तिलक वर्माचा स्ट्राईक रेट 128.98 इतका आहे. तर त्याचा अॅव्हरेज फक्त 17.80 इतका राहिला आहे.
सूर्यकुमार फॉर्ममध्ये कधी येणार?
दरम्यान, सूर्यकुमार यादवने गेल्या 18 टी-ट्वेंटी इनिंग्जमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावांची एकही मोठी खेळी केलेली नाही. सूर्यकुमार यादवचे मागील T20I अर्धशतक किंवा शतक 14 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे आले होते, जिथे त्याने 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याला एकही मॅचमध्ये चांगली खेळी करता आली नाही.
