TRENDING:

MI च्या पलटणची सटकली, हार्दिकचा फोटो शेअर करत म्हणाली 'कुछ भी', वादग्रस्त पोस्टवर स्पष्टच बोलली

Last Updated:

असताना एमआयच्या पलटणची सटकली आहे. कारण मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचा एक मीम फोटो शेअर करत 'कुछ भी' असे म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने वादग्रस्त पोस्टचा दावा खोडून काढली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Mumbai Indians : येत्या 28 मार्च 2026 पासून आयपीएल 2026 च्या हंगामाला सूरूवात होणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता विरूद्ध खेळवला जाणार आहे. या सामन्याला आता 15 दिवस उरले असताना एमआयच्या पलटणची सटकली आहे. कारण मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचा एक मीम फोटो शेअर करत 'कुछ भी' असे म्हटलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने वादग्रस्त पोस्टचा दावा खोडून काढली आहे.
mumbai indians
mumbai indians
advertisement

खरं तर आयपीएल सूरू व्हायला जवळजवळ 14-15 दिवसाचा कालावधी शिल्लक असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे.या पोस्टमध्ये आयपीएल 2026 च्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वी हार्दिक पांड्याने रोहित शर्माला वॉर्निंग दिल्याचा दावा केला जात आहे.त्यासोबत रोहित शर्माच्यी खेळाबद्दल यावेळेस कोणतीही हयगय केली जाऊ नये,अशे हार्दिक पांड्याने मुंबईच्या मॅनेजमेंटला सांगिल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.

advertisement

मुंबई इंडियन्सच मॅनेजमेंट मागच्या 10-12 वर्षापासून रोहित शर्माच्या परफॉर्मन्सवरून वैतागलं आहे. कारण त्याने प्रत्येक सीझनला 200-300 च्या आसपास धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 120 च्या आसपास होता. विशेष तो संघातला सर्वात महागडा खेळाडू असताना देखील त्याची अशी कामिगिरी आहे,असे दावा या पोस्टमध्ये केला आहे. ऑक्सिजन नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा दावा करण्यात आला होता.

advertisement

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या याच वादग्रस्त पोस्टवर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याचा मीम शेअर केला आहे. या मीमच्या कॅप्शनला त्याने 'कुछ भी' अशी कॅप्शन दिली आहे.त्यामुळे दोनच शब्दात मुंबई इंडियन्सने वादग्रस्त पोस्टचा दावा खोडून काढला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
झोपताना मोबाईल पाहताय? वेळीच सोडा सवय, नाहीतर मेंदूवर होतील हे परिणाम
सर्व पहा

याचाच अर्थ हार्दिक पांड्याने कोणत्याही प्रकारची वॉर्निग रोहित शर्माला दिलेली नाही आहे. आणि रोहित शर्माच्या परफॉर्मन्सवरून मॅनेजमेंटकडे कोणतीही तक्रार केलेली नाही आहे. या सगळ्या अफवा आहेत.त्यामुळे यावर विश्वास ठेवू नये,असे मुंबई इंडियन्सने चाहत्यांना म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI च्या पलटणची सटकली, हार्दिकचा फोटो शेअर करत म्हणाली 'कुछ भी', वादग्रस्त पोस्टवर स्पष्टच बोलली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल