भारतीय क्रिकेट संघाचे सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी२० वर्ल्ड कपपर्यंतच आहे. बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्या जागी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. यासाठी अर्जही मागवले आहेत. बोर्डाने यासाठी संकेतस्थळावर गूगल फॉर्मची लिंक दिली आहे. यावर योग्य उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन बीसीसीआयनं केलं होतं.
French Open : क्ले कोर्टच्या बादशहाला पराभवाचा धक्का; नदाल पहिल्यांदाच स्पर्धेतून 'असा' झाला बाहेर
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी २७ मे पर्यंत ३ हजार पेक्षा अधिक अर्ज आले. यात अनेक अर्ज फक्त नावासाठीच आहेत. सचिन तेंडुलकर, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून करण्यात आलेल्या अर्जांचा यात समावेश आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने या अर्जासंदर्भात इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, गेल्यावेळीही बीसीसीआयला असे अर्ज मिळाले होते. बोर्डाने गूगल फॉर्मच्या माध्यमातून असे अर्ज मागवल्यानं हा प्रकार घडतोय. मात्र याचा फायदाही होतो, कारण गुगल फॉर्मच्या माध्यमातून आलेल्या अर्जांची छाननी सोपी होते. मात्र काही लोक याचा गैरवापर करून चुकीच्या नावाने अर्ज दाखल करत आहेत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मात्र कोणकोणत्या खेळाडूंनी अर्ज केले आहेत हे सांगितलं नाही. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सर्वात पुढे गंभीरचं नाव असल्याची चर्चा आहे. मात्र गंभीरने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
