नेमकं काय घडलं?
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर 88 धावांनी विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 247 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 248 धावा करायच्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांपुढं पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. भारतानं पाकिस्तान विरुद्ध सलग 12 वेळा विजय मिळवला आहे. भारत या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. भारत आणि पाकिस्तान महिलांच्या या एकदिवसीय सामन्यात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची फिरकी गोलंदाज नशरा संधू यांच्यात मैदानावर बाचाबाची झाली. यावेळी नशरा संधूने हातवारे केले, तसंच डोळ वटारुन हरमनप्रीत कौरला बघत होती. यानंतर हरमनप्रीत कौर देखील तिच्याकडे बघत राहिली. यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
पाकिस्तानी बॉलरने वटारले डोळे
भारत पाकिस्तान सामना हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. मग सामना पुरुषांचा असो किंवा महिलांचा. सध्या कोलंबो येथे महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चे सामने खेळले जात आहे. त्यात कालचा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान खेळला गेला. या सामन्यात टॉस वेळीच वातावरण तापलं होत. भारताने 'नेशन फर्स्ट' ही भूमिका प्रत्येक वेळी निभावली आहे. अशातच महिलांनीही ही भूमिका बजावत पाकिस्तानी खेळाडूंसह हँड शेक करणं टाळलं. यानंतर हरमनप्रीत कौर फलंदाजी करत असताना 22 व्या षटकांत पाकिस्तानकडून फिरकीपटू नशरा संधू गोलंदाजीसाठी आली. हरमनप्रीतने चेंडू खेळल्यानंतर तो गोलंदाजी करत असलेल्या नशरा संधूच्या हातात गेला. यावेळी नशरा संधूने तिला डोळे वटारुन पाहिले. यानंतर हरमनप्रीत कौरनेही तिला प्रत्युत्तर दिले.
सामन्याची स्थिती काय होती?
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 247 धावा केल्या. स्मृती मानधनाने 23 आणि प्रतिका रावलने 31 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जने 32, दीप्ती शर्माने 25 आणि स्नेह राणाने 20 धावा केल्या. यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये भारताला 247 धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तिने 20 चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांसह नाबाद 35 धावा केल्या. हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. क्रांती गौड व्यतिरिक्त, दीप्ती शर्माने 9 षटकांत 45 धावांत 3 धावा दिल्या तर स्नेह राणाने 2 बळी घेतले. 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 43 षटकांत 159 धावांवरच गारद झाला. भारतीय गोलंदाजांसमोर टिकून राहिलेली पाकिस्तानची एकमेव फलंदाज सिद्रा अमीन होती. अमीनने 106 चेंडूत 81 धावा केल्या, ज्यात एक षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता. नतालिया परवेझने 46 चेंडूत 33 धावा केल्या. सिद्रा नवाजने 14 धावा केल्या, तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.