17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळलं
सोमवारी शारजाह येथे झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचा 90 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 173 धावा केल्या आणि नंतर विंडीजला 17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळले. आयसीसी पूर्ण सदस्य असलेल्या कसोटी राष्ट्राविरुद्ध नेपाळचा हा पहिलाच टी-ट्वेंटी मालिका विजय आहे. आसिफ शेख नेपाळच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 68 धावांची खेळी केली.
advertisement
जेसन होल्डरच्या 21 धावा
नेपाळसाठी संदीप जोरा याने देखील अफलातून कामगिरी केली अन् 63 धावांचं योगदान दिलं. तर मोहम्मद आदिल आलम याने चार विकेट्स घेतल्या अन् नेपाळला मोठी आघाडी मिळवून दिली होती. तर वेस्ट इंडिज खेळाडूंना नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जेसन होल्डरने संघासाठी सर्वाधिक 21 धावा केल्या. अकीम ऑगस्टेने 17 धावांची खेळी केली. आमिर जांगूला फक्त 16 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजचे हे तीनच फलंदाज आहेत ज्यांनी दुहेरी आकडा गाठला.
वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी खरी कसोटी
दरम्यान, नेपाळने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली असल्याने आता वेस्ट इंडिज संघाची नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. वेस्ट इंडिजला आपली प्रतिमा कायम राखता आली नाही. त्यामुळे भारताविरुद्ध असणारी कसोटी मालिका खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी खरी कसोटी असणार आहे.