रोल्फ वान डर मर्वे याचे संघात पुनरागमन
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळलेल्या मालिकेच्या तुलनेत या संघात बरेच बदल दिसतायत. दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करून आता नेदरलँड्सकडून खेळणाऱ्या रोल्फ वान डर मर्वे याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्यासोबतच बास डी लीड, मिचेल लेविट आणि जाक लॉयन सैशे यांनाही परत बोलावण्यात आले आहे.
advertisement
कॅप्टन पुन्हा स्कॉट एडवर्ड्स
कोलिन एकरमैन हा नोव्हेंबर 2024 नंतर तो पहिला टी-20 सामना खेळणार आहे. विटालिटी ब्लास्ट-2025 मध्ये त्याने 304 धावा कुटल्या होत्या. टिम वान डर गुगटेन हा 34 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज विटालिटी ब्लास्टमध्ये चमकदार कामगिरी करत संघात स्थान मिळवले आहे. जुलै 2024 पासून संघाबाहेर असलेल्या लोगन वान बीकचेही संघात पुनरागमन झाले आहे. संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी स्कॉट एडवर्ड्स याच्या खांद्यावर असेल. नेदरलँड्सचा संघ मोठ्या स्पर्धांमध्ये धक्कादायक निकाल देण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे त्यांना हलक्यात घेणे कोणत्याही संघाला महागात पडू शकते.
टी-20 वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्सचा संघ - स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), नोह क्रोस, मॅक्स ओ दाऊद, साकिब जुल्फीकार, आर्यन दत्त, काइल क्लेन, पॉल वान मीकेरेन, फ्रेड क्लासेन, कोलिन एकरमैन, बास डे लीड, मिचेल लेविट, जाक लियान सैसे, लोगान वान बीक, रोल्फ वान डर मर्वे, टिम वान डर गुगटेन.
