पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास
50 वर्षांचे सुहैल आणि त्यांचा 17 वर्षांचा मुलगा याह्या यांनी 6 नोव्हेंबर रोजी इंडोनेशियाविरुद्ध ईस्ट तिमोरच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली. विशेष म्हणजे, या दोघांनी एकत्र बॅटिंगही केली. ईस्ट तिमोरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रवास मात्र निराशाजनक ठरला आहे. त्यांनी आपले सुरुवातीचे तिन्ही मॅच 10-10 विकेट्सने गमावले आहेत.
advertisement
आई-मुलगी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये...
यापूर्वी महिला क्रिकेटमध्ये आई-मुलगी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र खेळल्या आहेत. या वर्षी, स्वित्झर्लंडच्या महिला टीममधील मॅटी फर्नांडीस (Matty Fernandes) आणि त्यांची मुलगी नैना मेटी साजू (Naina Matty Saju) यांनी सहा T20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकत्र खेळण्याचा विक्रम केला आहे.
शिवनारायण चंद्रपॉल आणि तेगनारायण
पुरुषांच्या क्रिकेटमध्येही अशा जोड्यांची चर्चा आहे. वेस्ट इंडिजचे शिवनारायण चंद्रपॉल आणि तेगनारायण यांनी 2014 मध्ये गयानासाठी 11 फर्स्ट क्लास मॅचमध्ये एकत्र खेळले होते. तसेच, अफगाणिस्तानचे मोहम्मद नबी अजूनही सक्रिय क्रिकेट खेळत आहेत, जेणेकरून त्यांना भविष्यात आपला मुलगा हसन इसाखिलसोबत आंतरराष्ट्रीय मॅच खेळता येईल.
लिलीव्हाइट कुटूंब
क्रिकेटमध्ये वडील-मुलगा एकाच टीममध्ये एकत्र खेळण्याची पहिली नोंद 1851 मध्ये झाली होती. इंग्लंडमध्ये 1851 ते 1853 दरम्यान लिलीव्हाइट कुटुंबाने (Lillywhite family) असा विक्रम केला होता. विलियम लिलीव्हाइट हे त्यांचे दोन मुलगे, जॉन आणि जेम्स यांच्यासोबत एकाच टीममधून खेळले होते.
