गुडघ्यावर चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या
नितीश कुमार रेड्डूी मायदेशी आल्यावर तिरुपती मंदिरात पोहोचला आणि तिथं त्याने गुडघ्यावर पायऱ्या चढल्या. नितीश कुमार रेड्डीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो लाल टी-शर्ट आणि काळ्या पॅटीवर दिसतोय. यावेळी त्याने जे काही केलं, ते पाहून तुम्हीही विचारात पडाल. नितीशने गुडघ्यावर तिरुपती मंदिराच्या पायऱ्या चढल्या. हळूहळू एक एक गुडघा ठेवत नितीश रेड्डीने आपला इच्छा पूर्ण केली.
advertisement
शतक झळकावत मोडला 76 वर्षांपूर्वीचा विक्रम
नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियात पहिलं कसोटी शतक झळकावणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला होता. त्याने 76 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. नितीशने वयाच्या 21 वर्षे 216 दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याच्या शतकीय कामगिरीनंतर अनेकांनी त्याचं तोंडभरून कौतूक देखील केलं होतं.
दरम्यान, नितीश कुमार रेड्डीचा खेळ पाहून सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री देखील भावूक झाले होते. तर रवी शास्त्री यांच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं. नितीश कुमार रेड्डीच्या कुटूंबियांनी देखील आनंद व्यक्त केला होता. नितीश ऑस्ट्रेलियाहून भारतात परतल्यावर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. नितीश याने विशाखापट्टणममध्ये पाऊल ठेवताच त्याच्या स्वागतासाठी लोकांची झुंबड उडाली. विमानतळापासून त्याच्या घरापर्यंत लोकांची गर्दी झाली होती.