64.30 कोटी रुपये शिल्लक
केकेआरने नुकताच आपल्या संघातून आंद्रे रसल आणि व्यंकटेश अय्यर सारख्या महागड्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. या निर्णयामुळे केकेआरकडे लिलावासाठी मोठी रक्कम उपलब्ध झाली आहे. सध्या त्यांच्याकडे पर्समध्ये तब्बल 64.30 कोटी रुपये शिल्लक आहेत. एवढा मोठा निधी हा नवीन आणि प्रभावी कॅप्टन खरेदी करण्यासाठी किंवा स्कॉडमध्ये मोठे बदल करण्यासाठी पुरेसा आहे.
advertisement
कॅप्टन्सी राहणार की जाणार?
64.30 कोटींची मोठी रक्कम पर्समध्ये असल्यामुळे, केकेआर लिलावात मोठ्या प्लेयर्सवर बोली लावू शकते. केकेआरकडे काही पर्याय आहेत. यामध्ये फाफ डुप्लेसिस, व्यंकटेश अय्यर, ग्लेन मॅक्सवेल, मयंक आग्रवाल यांसारखे पर्याय आहेत. याच्या जोरावर केकेआर नवा कॅप्टन शोधू शकते किंवा पुन्हा अजिंक्य रहाणे याच्याकडेच कॅप्टन्सी कायम ठेवली जाऊ शकते.
केकेआरचे रिटने केलेले खेळाडू : अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोड़ा आणि वरुण चक्रवर्ती.
केकेआरचे रिलीज केलेले खेळाडू : लवनिथ सिसौदिया, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, वेंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, मोइन अली, स्पेंसर जॉनसन, एनरिक नॉर्टजे, चेतन सकारिया.
