शुभमन गिल उपलब्ध नसेल तर...
जर गुवाहाटी टेस्टसाठी शुभमन गिल उपलब्ध नसेल, तर मला वाटतं की भारताला मधल्या फळीत उजव्या हाताच्या गोलंदाजाची आवश्यकता आहे. मला माहित आहे की साई सुदर्शन आणि देवदत्त पेडिक्कल यांना यांना तयार केलं जात आहे, ते दोघं स्कॉडमध्ये आहेत. पण टॉप 9 बॅटरमध्ये मग 7 लेफ्ट हँडर खेळाडू असतील, असं म्हणत हर्षा भोगले यांनी टीम इंडियाची सर्वात मोठी चूक दाखवून दिली.
advertisement
हर्षा भोगलेंनी सुचवले चार खेळाडू
टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी जर ऋतुराज गायकवाड, सरफराज खान आणि रजत पाटीदार यांना संधी दिली जाऊ शकते, जर हे खेळाडू फिट असतील तर, असंही हर्षा भोगले म्हणाले आहेत. माझा कल, एका कसोटीसाठी करूण नायर सारखा सर्वोत्तम फॉर्म असलेला खेळाडू निवडण्याचा असेल, असं म्हणत त्यांनी आपलं मत नोंदवलं आहे.
कोणत्या घोड्यावर डाव लावणार?
टीम इंडिया आता जुलै किंवा ऑगस्टपर्यंत टेस्ट क्रिकेट जास्त खेळणार नाही. त्यामुळे योग्य घोड्य़ावर डाव लावण्याची आत्ताच संधी आहे, असं हर्षी भोगले यांनी म्हटलं आहे. हर्षा भोगले यांनी साऊथ अफ्रिकेच्या खेळाचं कौतूक देखील केलं होतं. तसेच कॅप्टन टेम्बा बावुमाच्या कामगिरीवर त्याचे गोडवे देखील गायले होते.
