कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्व?
शुभमन गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचे नेतृत्व केएल. राहुलकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्या गैरहजेरीत राहुलला 'कॅप्टन' म्हणून जबाबदारी दिली जाऊ शकते. राहुलने यापूर्वीही भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, त्याची वनडे आकडेवारी देखील प्रभावी आहे.
advertisement
वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन
केएल राहुलने आतापर्यंत 88 सामन्यांत 48.31 च्या सरासरीने 3092 रन्स केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कठीण दौऱ्यात राहुलचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे, कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे या मालिकेद्वारे वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन होत आहे.
कसं असेल सिरीजचं वेळापत्रक?
दरम्यान, साऊथ अफ्रिकाविरुद्धची वनडे मालिका 30 नोव्हेंबरला रांची येथे पहिल्या सामन्याने सुरू होईल, त्यानंतर 3 डिसेंबरला रायपूर आणि 6 डिसेंबरला विझाग येथे सामने खेळवले जातील. घरच्या मैदानावर होणारी ही मॅच आणि दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन यामुळे ही मालिका रोमांचक होण्याची चिन्हे आहेत.
