TRENDING:

NZ vs WI : शेवटच्या 18 बॉलवर धू धू धुतलं... T20 मध्ये न्यूझीलंडचा महारेकॉर्ड, तरी वेस्ट इंडिजने मॅच फिरवली! Video

Last Updated:

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने वादळी खेळी केली आहे, पण या थरारक सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वेस्ट इंडिजच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात झाली आहे. दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचच्या सीरिजचा पहिला सामना ऑकलंडच्या इडन पार्कमध्ये खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 रननी थरारक विजय झाला, याचसोबत त्यांनी सीरिजमध्येही 1-0 ने आघाडी घेतली आहे. या संपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिजचंच वर्चस्व होतं, पण शेवटच्या काही ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनरने वादळी खेळी करत शेवटच्या विकेटसाठी रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप केली, पण तरीही न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही.
शेवटच्या 18 बॉलवर धू धू धुतलं... T20 मध्ये न्यूझीलंडचा महारेकॉर्ड, तरी वेस्ट इंडिजने मॅच फिरवली! Video
शेवटच्या 18 बॉलवर धू धू धुतलं... T20 मध्ये न्यूझीलंडचा महारेकॉर्ड, तरी वेस्ट इंडिजने मॅच फिरवली! Video
advertisement

शाय होपचा कॅप्टन्स नॉक

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांची सुरूवातही चांगली झाली. वेस्ट इंडिजने 43 रनवरच 3 विकेट गमावल्या होत्या. पण वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होपने 39 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली, ज्यात 4 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. रोव्हमन पॉवेलने 33 रन आणि रोस्टन चेसने 28 रन केले, यामुळे वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 164 रन करता आले. न्यूझीलंडकडून जॅक फाऊलकेस आणि जेकब डफी याला 2-2 विकेट मिळाल्या.

advertisement

न्यूझीलंडची बॅटिंग फ्लॉप

165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची बॅटिंग फ्लॉप ठरली. फक्त 109 रनवर त्यांनी 9 विकेट गमावल्या. टीम रॉबिन्सनने 27 आणि डेवॉन कॉनवेने 13 रन केल्या, तर रचिन रविंद्रही 21 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्क चॅपमन 7 आणि डॅरेल मिचेल 13 रनवर आऊट झाले. पण आठव्या क्रमांकावर बॅटिंगला उतरलेल्या मिचेल सॅन्टनरने वादळी खेळी केली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मेंढीपालन करण्याचं असं करा नियोजन, शांताराम पिसाळ महिन्याला कमावता 1 लाख रुपये!
सर्व पहा

न्यूझीलंडने 9वी विकेट गमावली तेव्हा त्यांना विजयासाठी 20 बॉलमध्ये 57 रनची गरज होती, पण मिचेल सॅन्टनरने फोर आणि सिक्सचा वर्षाव केला. इनिंगच्या 18व्या ओव्हरमध्ये मिचेल सॅन्टनरने लागोपाठ 5 बॉलमध्ये 5 बाऊंड्री मारल्या, ज्यात 4 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. यानंतर 19व्या ओव्हरमध्ये सॅन्टनरने तीन फोर मारल्या. सॅन्टनर यावरच थांबला नाही तर शेवटच्या ओव्हरमध्येही त्याने 1 फोर आणि 1 सिक्स मारून न्यूझीलंडला विजयाच्या जवळ आणलं. या सामन्यात सॅन्टनरने 28 बॉलमध्ये 55 रन केले. सॅन्टनरने त्याच्या इनिंगमध्ये शेवटच्या 18 बॉलपैकी 10 बॉलवर फोर आणि सिक्स मारले. याशिवाय त्याने 10व्या विकेटसाठी 50 रनची पार्टनरशीपही केली. न्यूझीलंडसाठी टी-20 क्रिकेटमध्ये शेवटच्या विकेटसाठीची ही सगळ्यात मोठी पार्टनरशीप होती, पण तरीही त्यांना विजय मिळवता आला नाही.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
NZ vs WI : शेवटच्या 18 बॉलवर धू धू धुतलं... T20 मध्ये न्यूझीलंडचा महारेकॉर्ड, तरी वेस्ट इंडिजने मॅच फिरवली! Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल