खरं तर पाकिस्तानचा कर्णधार सलमाना आगाच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमध्ये चार सामने खेळणार आहेत. यामधील 15 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीलंकेच्या कोलंबोत पार पडणाऱ्या भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे.त्यामुळे पाकिस्तान आधीच एक सामना खेळणार नाही आहे. त्यामुळे उरले फक्त तीन सामने. या तीनही सामन्यांवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे पावसामुळे पाकिस्तानचे क्वालिफाय होण्याचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
advertisement
कोलंबोचे हवामान अंदाज लागता न येण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या तीन सामन्यापैकी एकही सामना पावसामुळे रद्द झाला.तर नुसता पॉईटस टेबलमध्ये नुकसान होणार नाही आहे, तर नेट रनरेटमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना हा 7 फेब्रुवारी 2026 रोजी नेदरलँड विरूद्ध असणार आहे.अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार,पाकिस्तानच्या या पहिल्या सामन्यात 64 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.विशेष म्हणजे सामन्याच्या दुसऱ्या हिश्यात पावसाचा धोका अधिक आहे, ज्यामुळे हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे ज्या दोन सामन्यात पावसाची शक्यता अधिक आहे, ते पाकिस्तानचे सामने हे युएसए आणि भारत विरूद्ध आहेत, आणि ते 10 ते 15 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहेत. ज्यामधील भारताविरूद्ध सामन्यात त्यांनी बहिष्कार टाकला आहे. पण अजूनही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची अधिकृत माहिती आयसीसीला दिली नाही आहे.
दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्धच्या अंतिम गट सामन्यात पावसाची शक्यता 25 टक्के आहे, म्हणजेच सामना खेळण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात मोठी चिंता पाकिस्तानचा नेट रन रेट आहे. आयसीसी नियम 16.10.7 नुसार, जर एखाद्या संघाने सामना बहिष्कार घातला तर तो गमावलेला मानला जातो. अशा परिस्थितीत, डिफॉल्ट संघाने पूर्ण 20 षटके खेळली आहेत परंतु एकही धाव घेतली नाही असे मानले जाते. विरोधी संघाच्या नेट रन रेटवर परिणाम होत नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर त्यांनी भारताविरुद्ध सामना खेळला नाही तर पाकिस्तानचा नेट रन रेटवर
लक्षणीयरीत्या घसरू शकतो. जर पाकिस्तानने मैदानात उतरले असते तर ते पराभवाच्या बाबतीतही नेट रन रेटच्या आधारे स्पर्धेत राहू शकले असते.
एकंदरीत, एका सामन्याचा बहिष्कार आणि उर्वरित सामन्यांवर पावसाचा परिणाम होण्याचा धोका यामुळे पाकिस्तानला सुपर 8 मध्ये स्थान मिळवणे जवळजवळ अशक्य होते.अशा परिस्थितित इतक्या सगळ्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी पीसीबीच्या अध्यक्ष मोहसीन नक्वीवर हात जोडायची पाळी येणार आहे.
