TRENDING:

शेतकऱ्याच्या पोराची कमाल, पंढरपूरच्या पैलवान किशोरची मलेशियामध्ये गोल्डन कामगिरी, महाराष्ट्राचं नाव उंचावलं!

Last Updated:

कोल्हापूर येथे गंगावेस तालीम येथे कुस्तीचे शिक्षण घेऊन त्याने श्रीलंका आणि मलेशिया देशाच्या पैलवानांचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंढरपूर  : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील एका पैलवानाने अख्ख्या गावाचं आणि महाराष्ट्राचं नव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवलं आहे.  मलेशिया आणि थायलंड येथे सुरू असणाऱ्या इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या पैलवान किशोर पवार याने सुवर्णपदक पटकावलं आहे. शेतकऱ्याच्या पोराने गोल्डन कामगिरी केल्यामुळे गावात एकच जल्लोष करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे इथं राहणाऱ्या पैलवान किशोर पवार हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोल्हापूर येथे गंगावेस तालीम येथे कुस्तीचे शिक्षण घेऊन त्याने श्रीलंका आणि मलेशिया देशाच्या पैलवानांचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे. किशोर पवारच्या या यशाबद्दल सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धा मलेशिया येथे सुरू आहे. या स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत पैलवान किशोर पवार याने श्रीलंका, मलेशिया देशाच्या पैलवानांना धूळ चारली, त्यानंतर सुवर्ण पदकासाठी थायलंडच्या पैलवानाला अस्मान दाखवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताचा पैलवान किशोर पवार याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.

advertisement

वस्तादांनी केलं पठ्याचं कौतुक

खेडभोसे (ता. पंढरपूर) गावचा सुपुत्र असलेला पैलवान किशोर याचे आई-वडील हे शेती करत किशोर याला कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. पैलवान किशोर पवार हा कोल्हापूर येथील श्री. शाहू विजयी गंगावेश तालीम इथं वस्ताद विश्वास हरगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्या शिकत आहे. सध्या त्याला भारतीय सेना प्रशिक्षक उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

advertisement

महाविद्यालयात आनंदाचं वातावरण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ने आणली मायलेदार SUV, आता Maruti Wagon R पेक्षा आहे मजबूत अन् किंमतही कमी!
सर्व पहा

सुवर्णपदक मिळवून देशात नाव कमावलेला पैलवान किशोर पवार हा यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय, भोसे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक गणेश पाटील, प्राचार्य संजय मुजमुले यांच्यासह सर्व शिक्षक, खेडभोसे ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
शेतकऱ्याच्या पोराची कमाल, पंढरपूरच्या पैलवान किशोरची मलेशियामध्ये गोल्डन कामगिरी, महाराष्ट्राचं नाव उंचावलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल