रुद्रप्रयाग : कुणाचं नशिब कधी बदलू शकतं, हे कुणीही सांगू शकत नाही. पण असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं आहे. हा व्यक्ती पेट्रोप पंपावर काम करतो. मात्र, हा आज करोडपती झाला आहे. नेमकं कसं काय तो करोडपती झाला, त्याच्यासोबत असं नेमकं काय घडलं, तो कुठला आहे, हे जाणून घेऊयात.
काय आहे ही घटना -
advertisement
अनिल सिंह बिष्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. ते उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथील रहिवासी आहेत. अनिल सिंह यांनी ड्रीम 11 वर एक टीम बनवली होती आणि आता त्यांची टीम जिंकली आहे. याचे बक्षीस एक कोटी रुपये होते. आपल्या टीम जिंकल्याचे पाहिल्यावर त्यांना काही क्षण विश्वासही झाला नाही. यानंतर आता सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत.
उत्तराखंडच्या लोकांचे नशिब बदलत आहे. गेल्या वर्षी, आयपीएलसह विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये डझनभर लोकांनी लाखो कोटींची बक्षिसे जिंकली. यंदा विजेतेपदाची सुरुवात अनिल सिंग बिश्तपासून झाली आहे. अनिल हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील पाली गावातील रहिवासी आहेत. ते शहीद भगवान सिंह पेट्रोल पंपावर काम करतात. अनिलने सांगितले की, ते 2019 पासून ड्रीम 11 वर आपली टीम बनवत आहे. आत्तापर्यंत त्यांनी 9846 स्पर्धा खेळल्या आहेत. यात त्यांना सुमारे 3.5 लाख रुपये खर्च केले.
अनिल सिंह बिष्ट
ram mandir : या सोनारानं बनवली राम मंदिराची अप्रतिम अंगठी, किंमत किती? फोटोही पाहा
यूएई T-20 सामन्यात जिंकले एक कोटी रुपये -
त्यांनी सांगितले की, इतकी वर्षे यश मिळाले नाही. पण सध्या सुरू असलेल्या यूएई T-20 सामन्यात त्यांनी आपला संघ तयार केला होता. एका सामन्यात त्यांच्या संघाला 744 गुण मिळाले आणि ते अव्वल स्थानावर राहिले. त्यांचे पहिले बक्षीस एक कोटी रुपये होते. त्यांची टीम जिंकल्यावर त्यांना विश्वास बसला नाही. ते 1 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहेत. अनेकवेळा कन्फर्म केल्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यांच्या कुटुबात आता आनंदाचे वातावरण आहे. तसेच अनेक जण त्यांचे अभिनंदन करत आहेत.
सूचना - ड्रीम 11 किंवा इतर खेळांमध्ये खेळताना आर्थिक धोके आहेत. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर खेळावे. लोकल18 अशा खेळांना प्रोत्साहन देत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणे हा आहे.