मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी मोठा ट्विस्ट झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असलेल्या मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज माघारी घेतल्याने विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे अजिंक्य नाईक दुसऱ्यांदा MCAचे अध्यक्ष होतील.
advertisement
MCAची त्रैवार्षिक निवडणूक बुधवारी होणार होती. यासाठी मोठे नेते रिंगणात उतरले होते. या निवडणुकीच्या आधी शरद पवार यांनी आज १० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि अध्यक्षासह इतर पदांबाबत चर्चा केली होती. तर उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड विरुद्ध नविन शेट्टी अशी लढत होणार आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडूलजी देखील होत्या. मात्र सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांची निवड बिनविरोध झाली.
निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याची आज दुपारी 4 ही अंतिम मुदत होती. त्यामुळे निवडणूक कशी होणार याबाबत उत्सुकता होती. तसेच अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिवाणी न्यायालयाने ठेवला निर्णय राखून ठेवला. ध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या शाहआलंम शेख यांनी ही याचिका दाखल केली होती. कुलिंग पीरियडच्या नियमानुसार अजिंक्य नाईक निवडणूक लढवू शकत नसल्याचा शहाआलंम शेख यांचा दावा होता.
