प्रतिका रावलला मिळणार वर्ल्ड कप मेडल
प्रतिका रावलने सीएनएन न्यूज 18 ला पुष्टी दिली की, आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी तिला वर्ल्ड कप पदक मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप केला आहे. पीएम मोदी यांच्यासोबतच्या मिटिंगमध्ये तिने जे परिधान केलं होते ते सपोर्ट स्टाफ मेडल होतं पण तिला लवकरच स्वतःचं पदक मिळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आयसीसीच्या नियमानुसार, जे खेळाडू संघाचा अधिकृत भाग आहेत अशाच खेळाडूंना मेडल दिलं जातं. दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्यामुळे तिच्या बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली होती. तिच्या जागी शेफाली वर्माला मेडल देण्यात आलं होतं. अशातच आता जय शहा यांनी पुढाकार घेतल्याने प्रतिका रावल हिला वर्ल्ड कपच मेडल मिळणार आहे.
अमनजोत कौरने मन जिंकलं
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान मोदींनी खेळाडूंसोबत फोटोशूट केलं. या फोटोशूटसाठी प्रतिका रावळ देखील उपस्थित होती. सर्व खेळाडूंनी वर्ल्डकप विनिंग मेडल देखील गळ्यात घातलं होतं. प्रतिका रावळला वर्ल्डकप विनिंग मेडल दिलं गेलेलं नाही. पण अमनजोत कौरने आपलं मेडल प्रतिकाला दिलं. अमनजोत कौरच्या या कृतीचं जोरदार कौतुक होत आहे.
