खरं तर हा खेळाडू भारतीय असावा,अशीच सगळ्यांची अपेक्षा असेल. पण हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून साऊथ आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डीकॉक आहे. क्विंटन डीकॉक मागच्याच काही वर्षापुर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.पण आता त्याने पाकिस्तान दौऱ्यासाठी निवृत्ती मागे घेतली आहे.त्यामुळे त्याला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यासाठी तसेच त्यापूर्वी नामिबियामध्ये होणाऱ्या एकमेव टी20सामन्यासाठी एकदिवसीय आणि टी20 संघात स्थान देण्यात आले आहे.
advertisement
डी कॉकने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर 50 षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.तर त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा व्हाईट-बॉल सामना 2024 मध्ये बार्बाडोसमध्ये खेळला होता. हा सामना टी20 विश्वचषकातला अंतिम सामना होता. तसेच डी कॉक कधीही अधिकृतपणे टी20 सामन्यांमधून निवृत्त झाला नसला तरी, त्याला दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्याही संघात स्थान देण्यात आले नव्हते. दरम्यान, तो अलीकडेच संपलेल्या सीपीएलसह जगभरातील टी20 लीगमध्ये सक्रिय होता.
सध्याचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी डी कॉकशी चर्चा केली आहे आणि सांगितले आहे की तो पुन्हा राष्ट्रीय संघासाठी वचनबद्ध आहे.क्विंटनचे व्हाईट-बॉलच्या क्षेत्रात पुनरागमन आमच्यासाठी एक मोठे प्रोत्साहन आहे,कॉनराड म्हणाले.गेल्या महिन्यात जेव्हा आपण त्याच्या भविष्याबद्दल बोललो तेव्हा हे स्पष्ट होते की त्याच्याकडे अजूनही त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा आहे. तो संघात कोणत्या दर्जाचा गुण आणतो हे सर्वांना माहिती आहे आणि त्याला परत आणल्याने संघालाच फायदा होऊ शकतो, असे कॉनराड यांनी सांगितले.
कारकिर्द
डी कॉकने 155 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 45.74 च्या सरासरीने आणि 96.64 च्या स्ट्राईक रेटने 6770 धावा केल्या आहेत.92 टी20 सामन्यांमध्ये त्याने 138.32 च्या स्ट्राईक रेटने 2584 धावा केल्या आहेत. त्याने 2015, 2019 आणि 2023 तीन एकदिवसीय विश्वचषक खेळले आहेत.आणि निवृत्तीनंतर त्याने गमावलेली एकमेव आयसीसी स्पर्धा म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिथे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत बाद झाली होती.