खरं तर तामिळनाडू प्रिमियर लीगमध्ये आज मदुराई पॅथर्स आणि दिंडीगुल ड्रॅगनमध्ये सामना रंगला होता.या सामन्यात मदुराई पॅथर्सने प्रथम फलंदाजी करताना 150 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे दिंडीगुल ड्रॅगन समोर 151 धावांचे आव्हान होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिंडीगुल ड्रॅगनची सूरूवात चांगली झाली होती.कर्णधार रविचंद्रन अश्विनने 49 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर आयपीएलमध्ये पंजाबच्या ताफ्यात असलेल्या शिवम सिंहने वादळीच खेळी केली. त्याने तब्बल 41 बॉलमध्ये 86 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले आहेत. त्याच्या जोडीला हनी सैनी होता त्याने 14 धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे अश्विनच्या दिंडीगुल ड्रॅगनने 13 ओव्हरमध्येच 9 विकेट राखून ही मॅच जिंकली.
advertisement
मुदराई पॅथर्सकडून आतिक रहमाने 50 धावांची अर्धशतकीय खेळी केली आहे. त्याच्या जोडीला अनिरूद्ध सिरामने 31 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर मदुराई पॅथर्सने 20 ओव्हरमध्ये 150 धावा केल्या होत्या.