TRENDING:

R Ashwin Net Worth : नुसत्या IPL मधून 100 कोटी कमावतो,इतर कमाई विचारूच नका, कोट्यवधींचा मालक आर अश्विन

Last Updated:

अश्विनच्या क्रिकेटींग करिअरची प्रचंड चर्चा रंगली आहे. दरम्यान आर.अश्विन नेमक्या किती कोटीच्या संपत्तीचा मालक आहे? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
R Ashwin Net Worth : टीम इंडियाचा अनुभवी भारतीय ऑफ-स्पिनर आर.अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या आठ महिन्यानंतर आयपीएलमधून रिटायरमेंटची घोषणा केली आहे. अश्विनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याबाबतची माहिती दिली आहे. यानंतर अश्विनच्या क्रिकेटींग करिअरची प्रचंड चर्चा रंगली आहे. दरम्यान आर.अश्विन नेमक्या किती कोटीच्या संपत्तीचा मालक आहे? हे जाणून घेऊयात.
r ashwin net worth
r ashwin net worth
advertisement

आर अश्विनने 2009 साली चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून आयपीएलमध्ये डेब्यू केले होते.त्यानंतर तब्बल एका दशकानंतर 9.75 कोटी रूपयांमध्ये तो पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचा भाग झाला होता.त्यानंतर आयपीएल 2025च्या हंगामात त्याने शेवटचा सामना याच संघाकडून खेळला.

2008 साली आर. अश्विनला चेन्नई सुपर किंग्जने 12 लाख रूपयाच्या बेसप्राईसवर साईन केले होते. 2010 पर्यत तो याच प्राईजवर खेळत राहिला.2011 मध्ये त्याची फी 3 करोड 91 लाख झाली. त्यानंतर 2013 पर्यंत याच रक्कमेवर खेळणाऱ्या अश्विनला चेन्नई सुपर किंग्जने सात कोटी रुपयांना रिटेन केलं. 2015 मध्ये जेव्हा स्पॉट फिक्सिंगमुळे फ्रँचायझीवर बंदी घालण्यात आली. तेव्हा अश्विन धोनीसह नवीन फ्रँचायझी रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये सामील झाला. 2016 आणि 2017 मध्ये त्याचे शुल्क 7.5 लाख रुपये होते.

advertisement

2018 च्या लिलावात त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले. तो पुढील दोन हंगामांसाठी पंजाबसोबत राहिला. 2020 मध्ये तो त्याच किमतीत दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला. येथेही पंजाबप्रमाणेच त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.2022च्या मेगा लिलावात अश्विनची टीम पुन्हा एकदा बदलली.आता तो 2024 पर्यंत पाच कोटींच्या शुल्कात राजस्थान रॉयल्ससोबत राहिला. त्यानंतर 2025 च्या मेगा लिलावात, अश्विनला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात मोठी रक्कम म्हणजेच 9.75 कोटी रुपये मिळाले.

advertisement

अशाप्रकारे अश्विनने 2009 ते 2025 पर्यंत आयपीएलमध्ये 97,24,00,000 (97 करोड 24 लाख रूपये) फी मिळाली. पण अश्विनची एकूण संपत्ती 150 करोड आहे.यामध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पैसे, बीसीसीआय करार, आयपीएल फी, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर गुंतवणूक समाविष्ट आहेत. तो दरवर्षी अंदाजे

4.5-5 कोटी रुपये कमावतो.

चेन्नईमध्ये आलिशान घर

आर.अश्विनचे चेन्नईमध्ये आलिशान घर आहे. 2021 साली त्याने चेन्नईच्या एका पॉश भागात एक घर खरेदी केले.जिथे तो त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसह राहतो.त्याची पत्नी प्रीती अश्विन ही एक व्यावसायिका आहे.

advertisement

लक्झरी कार कलेक्शन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

आर अश्विन यांच्याकडे कार कलेक्शनचा मोठा साठा आहे. ज्यामध्ये 6 कोटी रुपये किमतीची रोल्स-रॉइस आणि 93 लाख रुपये किमतीची ऑडी क्यू 7 यांचा समावेश आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
R Ashwin Net Worth : नुसत्या IPL मधून 100 कोटी कमावतो,इतर कमाई विचारूच नका, कोट्यवधींचा मालक आर अश्विन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल