आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दारुण पराभव केला. अवघ्या 11 षटकांत लक्ष्य पूर्ण करत 8 गडी राखून ट्रॉफीवर कब्जा केला. नाणेफेक जिंकल्यानंतर पॅट कमिन्सने कोलकाताविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीने हैदराबादला सुरुवातीलाच बॅकफूटवर आणले. लागोपाठ दोन विकेट गमावल्याने संघ दडपणाखाली गेला. तो पुन्हा सावरलाच नाही. संपूर्ण संघ 113 धावांवर गडगडला आणि व्यंकटेश अय्यरच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने अवघ्या 10.3 षटकांत विजयाची नोंद केली.
advertisement
वाचा - SRH हरली आणि मालकीण काव्या मारनला भर मैदानात अश्रू अनावर Video
आजारी आईला सोडून भारतात
क्वालिफायरमध्ये हैदराबादविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर कोलकाताचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजने सांगितले होते की, तो त्याच्या आजारी आईला अफगाणिस्तानात सोडून आला होता. आयपीएल फायनलमध्ये गुरबाजने 39 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली. सामन्यानंतर त्याने सांगितले की, तो सामन्यापूर्वी त्याच्या आईशी बोलत होता. तो म्हणाला, माझ्या आईची तब्येत आता ठीक आहे. ती हा सामना पाहत होती. मी सामन्यापूर्वी तिच्याशी बोललो आणि विचारले, मी तुझ्यासाठी काय आणू? माझ्यासाठी फक्त ट्रॉफी जिंकणे पुरेसे आहे, असं आईचं उत्तर होतं.