TRENDING:

Champion 'द्रविड गुरुजी', 17 वर्षांपूर्वीच्या कटू आठवणींचा गोड शेवट

Last Updated:

ज्या वेस्ट इंडिज दौऱ्यानं १७ वर्षांपूर्वी द्रविड यांना कटू आठवणी दिल्या त्याच वेस्ट इंडिजमध्ये ‘द्रविड गुरुजीं’ची टीम इंडिया चॅम्पियन ठरली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिद्धेश कानसे, मुंबई : बार्बाडोसमध्ये पोडियमवर विजयाचा जल्लोष सुरु होता... तितक्यात विराट कोहली T20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन पुढे आला. त्यानं ती ट्रॉफी एका खास व्यक्तीकडे दिली. आणि ती ट्रॉफी घेऊन त्यानं असा जल्लोष केला की तुम्ही आधी कधीही त्या व्यक्तीला तसा जल्लोष करताना कदाचित पाहिलं नसेल. विराटनं ज्यांच्या हाती ती ट्रॉफी दिली ते होते टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड. अत्यंत शांत, संयमी द्रविड गुरुजींनी त्यावेळी अगदी विशीतल्या पोरासारखं सेलिब्रेशन केलं. आणि एका क्षणात १७ वर्षांपूर्वींच्या ‘त्या’ कटू आठवणी पुसल्या गेल्या.
News18
News18
advertisement

२००७ चा वन डे वर्ल्ड कप. तोच तो वेस्ट इंडिज मधला. त्रिनिदादमध्ये भारतीय संघ तीन साखळी सामने खेळला. पण बांगदेशविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का. बर्मुडाविरुद्ध दुसऱ्या मॅचमध्ये ४०० धावांचा डोंगर. पण श्रीलंकेनं करो या मरोच्या मॅचमध्ये भारताचं रिटर्न तिकीट कन्फर्म केलं. भारतीय संघ सुपर ८ फेरीपूर्वीच स्पर्धेतून बाद झाला. करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. वर्ल्ड कपच्या इतिहासातली भारतासाठीची ती सर्वात वाईट स्पर्धा ठरली. त्या भारतीय संघाचे कॅप्टन होते राहुल द्रविड.

advertisement

पराभवानंतर राहुल द्रविडवर जोरदार टीका झाली. कर्णधारपद सोडावं लागलं. द्रविडसाठी तो शेवटचा वर्ल्ड कप ठरला. आणि वेस्ट इंडिजमधल्या त्या वर्ल्डकपनंतर भारताच्या या महान खेळाडूची कारकीर्दही उतरणीला लागली. त्या वर्ल्ड कपमधला पराभव द्रविड यांच्या इतका जिव्हारी लागला की त्यांनी आपला फोनही बंद केला होता. बराच काळ इतरांशी बोलणं बंद केलं होतं.

advertisement

IND vs SA Final : पराभवाने दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरचा सुटला तोल, वापरले अपशब्द

यावेळी तब्बल १७ वर्षांनी वेस्ट इंडिजमध्ये आयसीसीनं वर्ल्ड कपचं पुन्हा आयोजन केलं. यावेळी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबत होते राहुल द्रविड. महत्वाची गोष्ट ही की द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीचा या स्पर्धेनं समारोप होणार होता. त्यामुळे द्रविड यांच्यासाठी ही शेवटची संधी होती. भारतीय खेळाडूंनी द्रविड गुरुजींना विजयी भेट देऊन ही स्पर्धा अविस्मरणीय केली. ट्रॉफी हातात घेतल्यानंतर द्रविड यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच वेगळाच होता. असं वाटत होतं की द्रविड या क्षणाचीच वाट पाहत होते.

advertisement

२०२१ मध्ये प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळनंतर द्रविड यांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेलं. त्याआधी २०१८ मध्ये द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अंडर १९ संघ विश्वविजेता बनला होता. पुढे सिनियर टीमचं प्रशिक्षक म्हणून काम करताना द्रविड यांनी संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा मेळ घातला. एक बेस्ट टीम तयार केली. याच टीमनं २०२२ मध्ये टी२० वर्ल्ड कपची सेमी फायनल आणि मग त्यानंतर २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कपची फायनल गाठली. पण दोन्हीवेळा अपयश आलं. मात्र त्यानंतर अवघ्या सात महिन्यात टीम इंडिया सावरली. उभी राहिली. आणि ज्या वेस्ट इंडिज दौऱ्यानं १७ वर्षांपूर्वी द्रविड यांना कटू आठवणी दिल्या त्याच वेस्ट इंडिजमध्ये ‘द्रविड गुरुजीं’ची टीम इंडिया चॅम्पियन ठरली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Champion 'द्रविड गुरुजी', 17 वर्षांपूर्वीच्या कटू आठवणींचा गोड शेवट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल