Anvay Dravid KSCA Award : भारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल' म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या राहुल द्रविडने क्रिकेट वर्तुळात अनेक रेकॉर्ड केले आहेत.या द्रविडनंतर त्याचा थोरला लेक समित द्रविडने ही क्रिकेटमध्ये खबळब उडवून दिली होती.त्यानंतर आता क्रिकेट जगतात तिसरा द्रविड आला आहे. अन्वय द्रविड असे त्याचे नाव असून आता त्याने क्रिकेट वर्तुळात धमाका केला आहे. त्यामुळे हा तिसरा द्रविड आहे कोण?आणि क्रिकेट वर्तुळात त्याने काय पराक्रम केला आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
क्रिकेट जगतातला हा तिसरा द्रविड दुसरा तिसरा कुणी नसून द्रविडचा धाकटा लेक अन्वय द्रविड आहे. अन्वय द्रविड सध्या अंडर 16 मध्ये खेळतोय.या कॅटेगरीत खेळत असताना त्याने मोठा पराक्रम केला आहे. त्याने तब्बल 8 सामन्यात 459 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या या कामगिरीबद्दल आता त्याला केएससीए अवॉर्ड (KSCA Award) दिला जाणार आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी त्याने हा पुरस्कार पटकावला आहे.त्यामुळे त्याची क्रिकेट वर्तळात प्रचंड चर्चा रंगली आहे.
कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA Award) वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये अन्वय द्रविडला पुन्हा एकदा सन्मानित केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील याच पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे अन्वय द्रविडला सलग दुसऱ्या वर्षी केएससीए पुरस्कार मिळाला आहे.
अंडर 16 मध्ये खतरनाक कामगिरी
अन्वय द्रविडने अंडर 16 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याच्या शानदार फलंदाजीसाठी हा पुरस्कार जिंकला आहे.त्याने 6 सामन्यांमध्ये 8 डावांमध्ये 459 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने 91.80ची सरासरी राखली आणि दोन शतकेही ठोकली. या दरम्यान त्याने 46 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
अन्वय द्रविडने त्याच्या कामगिरीने कर्नाटक संघाला केवळ बळकटी दिली नाही तर तो संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला. इतकेच नाही तर त्याची सरासरी स्पर्धेतील सर्व फलंदाजांमध्ये सर्वोत्तम होती.
केएससीए पुरस्कार सोहळ्यात अन्वय व्यतिरिक्त, इतर अनेक खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले होते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मयंक अग्रवालचा सन्मान करण्यात आले. कर्नाटकसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याला हा पुरस्कार मिळाला. मयंकने स्पर्धेत 93 च्या सरासरीने 651 धावा केल्या.
तसेच रणजी ट्रॉफीमध्ये 64.50 च्या सरासरीने 516 धावा केल्याबद्दल वर्षीय फलंदाज आर. स्मरनला सन्मानित करण्यात आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 213 धावा केल्याबद्दल विकेटकीपर-फलंदाज केएल श्रीजितलाही पुरस्कार देण्यात आला आहे.