राजस्थानच्या पोस्टमध्ये काय?
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून राहुल द्रविडच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. आयपीएल 2026 आधीच राहुल द्रविड यांनी आपल्या मुख्य कोच पदाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे. राहुल अनेक वर्ष राजस्थान रॉयल्सच्या प्रवासाचा हिस्सा होता. त्यांच्या नेतृत्वाचा अनेक खेळाडूंवर प्रभाव पडला आहे. फ्रँचायझीच्या स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुलला फ्रँचायझीमध्ये मोठ्या पदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती स्वीकारली नाही.राजस्थान रॉयल्स, त्याचे खेळाडू आणि जगभरातील लाखो चाहते राहुलने फ्रँचायझीसाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे आभार मानतात.
advertisement
राहुल द्रविड मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये राजस्थान स्थानच्या मुख्य प्रशिक्षक बनले होते. राहुल द्रविडने भारतीय संघाला 2024 ला टी20 विश्वकप जिंकून दिल्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांच्यासोबत करार केला होता. राहुल द्रविडच राजस्थान रॉयल्ससोबतच जूनं नात आहे. त्याने आयपीएलमध्येही या संघाचे नेतृत्व केले आहे. राजस्थान 2012 आणि 2013 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळला. 2014 आणि 2015मध्ये तो संघाचा मार्गदर्शकही होता. त्यानंतर 2016 मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता कॅपिटल्स) मध्ये सामील झाला. द्रविड पुन्हा राजस्थान फ्रँचायझीशी जोडला गेला, पण यावेळी त्याचा प्रवास एक वर्षही टिकू शकला नाही.
2025 च्या हंगामात खराब कामगिरी
राजस्थान रॉयल्ससाठी 2025चा आयपीएल हंगाम चांगला राहिला नाही.राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठीही क्वालिफाय करू शकली नाही. त्यानंतर राहुल द्रविडने संघाच्या मुख्य कोचची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर फ्रेंजायजीला त्यांच्याकडून खूप आशा होती. पण संघ हवीतशी चांगली कामगिरी करू शकला नाही. राजस्थान रॉयल्सचा संघ मागच्या सीझनमध्ये 14 सामन्यातून फक्त चारच सामने जिंकण्यात यशस्वी ठरला तर उरलेल्या 10 सामन्यात 8 गुणांसह तर नवव्या स्थानावर राहिली होती.
खरं तर फ्रँचायझीच्या स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुलला फ्रँचायझीमध्ये मोठ्या पदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती स्वीकारली नाही.या कारणामुळेच राहुल द्रविडने प्रशिक्षकपद सोडल्याची माहिती आहे.