मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
आयपीएल 2026 च्या आधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संगकारा रॉयल्समध्ये राहुल द्रविडची जागा घेईल. 2025 च्या आयपीएलमध्ये खराब कामगिरीनंतर राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स सोडले. गेल्या पाच वर्षांत रॉयल्सची ही सर्वात वाईट आयपीएल कामगिरी होती.
advertisement
जुना हुकमी एक्का बोलवला
राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजमेंटच्या वादाच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता राजस्थान रॉयल्सने आपला जुना हुकमी एक्का कुमारा संगाकारा याला पुन्हा बोलवून घेतलं आहे. 16 डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या लिलावात तो महत्त्वाची भूमिका बजावेल. संगकारा 2021 ते 2024 या काळात मुख्य प्रशिक्षक होता. त्यावेळी राजस्थानची कामगिरी चांगली राहिली होती.
राजस्थानचा कॅप्टन कोण?
संजू सॅमसन याला चेन्नई सुपर किंग्जकडे ट्रेड केल्यानंतर राजस्थान रॉयल्सला नवा कॅप्टन शोधणं गरजेचं आहे. रॉयल्सकडे यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल हे पर्याय आहेत. परंतू ऑक्शनमधून कोणता नवा कॅप्टन शोधता येईल का? याचा विचार राजस्थान रॉयल्स करत आहे. राजस्थान प्रामुख्याने फाफ डुप्लेसिसवर डाव लावणार का? असा सवाल देखील विचारला जात आहे.
राजस्थान रॉयल्सचे रिटने केलेले खेळाडू - ध्रुव जुरैल, जोफ्रा आर्चर, क्वेना माफका, लुआन ड्रे प्रीटोरियस, नांद्रे नर्गर, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, तुषार देशपांडे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जायसवाल, युद्धवीर सिंह, रवींद्र जडेजा, सॅम करन आणि डोनोवान फरेरा.
राजस्थान रॉयल्सचे रिलीज केलेले खेळाडू - कुणाल सिंह राठौड, अकाश मधवाल, अशोक शर्मा, फजल फारूकी, कुमार कार्तिकेय, वानिंदु हसरंगा आणि महीश तीक्षणा.
