आयपीएलच्या ट्रेंड विंडोमुळे संघात या हालचालींना सुरूवात झाली आहे. हा ट्रेंड विंडो आयपीएल 2025 च्या फायनलच्या एका दिवसानंतर म्हणजे 4 जून 2025 पासून सूरू झाला आहे. आता ही विंडो 2026 च्या ऑक्शनच्या एक आठवड्याआधीपर्यंत खुली राहणार आहे. याचाच अर्थ फ्रेंचायजींकडे आपला स्क्वाड मजबूत करण्यासाठी खूप वेळ आहे. तरी देखील आतापासूनच हालचालीचा सूरूवात झाली आहे.
advertisement
एका टीम इनसाईडरने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आमच्या संघातील सहा खेळाडूंसाठी अनेक फ्रेचायजींनी आम्हाला संपर्क केला आहे.आम्ही देखील काही खेळाडूंसाठी दुसऱ्या फ्रेंचायजींशी बोलणी करत आहोत.त्यामुळे गोष्ट एकदम स्पष्ट आहे, प्रत्येक टीम आपला स्क्वॉड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचा देखील तोच विचार आहे.
खरं तर राजस्थान संघाने या सहा खेळाडूंची नावे सांगितली आहेत. पण या खेळाडूंमध्ये संजू सॅमसनचं नाव प्रचंड चर्चेत आहे. 2013 पासून राजस्थानचा भाग असलेला संजू बराच काळ संघाचा स्टार खेळाडू राहिला आहेच, पण संघाचे नेतृत्वही त्याच्या खांद्यावर आहे, पण आता त्याच्या भविष्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या खेळाडूंमध्ये संजू सॅमसनचे नाव आघाडीवर आहे. जर राजस्थान रॉयल्सने त्यांचा कर्णधार बदलण्यास सहमती दर्शविली तर आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरू शकतो. संजूला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी दोन संघ आघाडीवर मानले जातात, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर).
संजू हा सीएसकेसाठी एक परिपूर्ण पर्याय असू शकतो कारण आयपीएल २०२६ पर्यंत एमएस धोनी ४५ वर्षांचा होईल आणि त्याने आधीच संकेत दिले आहेत की तो जास्त काळ खेळणार नाही. दुसरीकडे, केकेआरबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे क्विंटन डी कॉक आणि रहमानउल्लाह गुरबाज सारख्या विकेटकीपरचा पर्याय आहे, परंतु दोघांचीही कामगिरी संपूर्ण हंगामात स्थिर राहिलेली नाही.
राजस्थान रॉयल्सकडे तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल आहे. ध्रुव जुरेलसारख्या उदयोन्मुख स्टारने केवळ विकेटकीपिंगमध्येच नव्हे तर फलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला सॅमसनचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.