खरं तर रणजी ट्रॉफी ईलाईट 2025-26 स्पर्धेत मुंबई विरूद्ध राजस्थान या दोन संघात सामना सुरू आहे. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आहे. मुंबईच्या अजिंक्य रहाणे, कर्णधार शार्दुल ठाकूर आणि सरफराज खान हे तीनही खेळाडू फ्लॉप ठरले होते. हे तीनही खेळाडू टीम इंडियातून खेळण्याची स्वप्न पाहतायत. पण या खेळाडूंनी राजस्थान विरूद्ध खेळताना अजिंक्य रहाणेच्या बॅटीतून फक्त 3 धावा आल्या आहेत. सरफराज खानने 15 तर कर्णधार शार्दुल ठाकूरने 18 धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात देखील हे खेळाडू फ्लॉप ठरले होते.
advertisement
जम्मू काश्मिरमधील पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे पहिल्या डावात 27,सरफराजने 42 तर शार्दुल ठाकूर शु्न्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे शुन्यावर,सरफराज 32 आणि शार्दुल ठाकूर 9 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे या धावा पाहून या खेळाडूंना खरंच संघात संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबईकडून खेळताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. या व्यतिरीक्त मुशीर खानने 49 धावा केल्या होत्या. यापैकी इतर खेळाडू फारशा सन्मानजनक धावा करू शकली नाही.त्यामुळे मुंबईचा पहिला डाव हा 254 धावांवर ऑल आऊट झाला होता. राजस्थानकडून कुकना अजय सिंहने 4 विकेट,अशोक शर्माने 3 विकेट, राहुल चहर, अंकित चौधरी, आकाश सिंहने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
राजस्थानच्या पहिल्या डावाला सूरूवात झाली आहे. राजस्थानने पहिल्या दिवसअखेर 10 धावा करत एकही विकेट गमावली नाही आहे. राजस्थान अजून 244 धावा दूर आहे. आता मुंबईचे गोलंदाज राजस्थानला किती धावात रोखतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
