आर अश्विनने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा बॉल टाकल्याचा विक्रम केला आहे. अश्विनने आयपीएलमध्ये 4 हजार 710 बॉल टाकण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याच्यानंतर कोलकत्ताच्या सुनील नरीनचा नंबर लागतो.कारण सूनील नरीनने आयपीएलमध्ये 4 हजार 345 बॉल टाकले आहेत. भूवनेश्वर कुमार या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे. भूवनेश्वर कुमारने 4 हजार 222 बॉल टाकले आहेत. तर अश्विनचा सहकारी रविंद्र जडेजाने 4 हजार 56 बॉल टाकले आहेत.त्यामुळे अश्विनचा रेकॉर्ड पाहता त्याच्या नजीक पोहोचायला इतर गोलंदाजांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
advertisement
आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड अश्विनच्या नावावर आहे, अश्विनने प्लेऑफमध्ये 21 विकेट घेतले आहेत. तर त्याच्या खालोखाल रविंद्र जडेजा आहे.जडेजाने 19 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर हरभजन सिंहचा नंबर लागतो. हरभजन सिंहने 17 विकेटस घेतल्या आहेत. तर चौथ्या स्थानी युजवेंद्र चहल आहे. चहलच्या नावावर 13 विकेट आहेत.
निवृत्तीच्या पोस्टमध्ये अश्विन काय म्हणाला?
खास दिवस आणि एक खास सुरुवात. प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते असे म्हणतात. आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा प्रवास आज संपतो पण मी खेळाचा शोध घेत राहतो आणि वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत राहीन, असं आर अश्विन म्हणाला आहे. प्रत्येक शेवटाला एक नवीन सुरुवात असते, आयपीएल क्रिकेटर म्हणून माझा काळ आज संपत आहे, परंतु विविध लीगभोवती खेळाचा शोध घेणारा माझा काळ आजपासून सुरू होतोय, असंही अश्विनने म्हटलंय.
38 वर्षीय ऑफ-स्पिनर अश्विनने 221 आयपीएल सामन्यांमध्ये 187 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 7.20 होता. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 4/34 होती. याशिवाय, त्याने 98 डावांमध्ये 833 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 50 होती. अश्विनने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 5 संघांसाठी खेळला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. त्याने स्पर्धेत पंजाबचे नेतृत्वही केले.