मागची बरीच वर्ष रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग होता, तसंच धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर जडेजाला कर्णधार करण्यात आलं, पण आयपीएलच्या मध्येच त्याचं कर्णधारपद काढून घेतलं गेलं होतं. रवींद्र जडेजाला ट्रेड केल्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जडेजाचं कोलकात्यातून उत्तर
दरम्यान रवींद्र जडेजाने त्याच्या या ट्रेडचं कोलकात्यामधून 6 तासांमध्येच उत्तर दिलं आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली टेस्ट मॅच इडन गार्डनवर सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची अवस्था वाईट झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने गमावलेल्या पहिल्या 6 विकेटपैकी 4 विकेट या एकट्या जडेजाने घेतल्या आहेत. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा 189 रनवर ऑल आऊट झाला, त्यानंतर टीम इंडियाला 189 रनपर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे भारतीय टीमला 30 रनची छोटी आघाडी मिळाली.
advertisement
कमी आघाडी असताना तसंच चौथ्या इनिंगमध्ये मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणं टीम इंडियाला अवघड गेलं असतं, पण जडेजाने सुरूवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेला धक्के द्यायला सुरूवात केली. जडेजाने एडन मार्करम, वियान मल्डर, टॉनी डे झोर्झी आणि ट्रिस्टन स्टब्स यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 93/7 एवढा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे 63 रनची आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा 29 रनवर तर कॉर्बिन बॉश 1 रनवर खेळत आहे. रवींद्र जडेजाच्या 4 विकेटशिवाय कुलदीप यादवने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.
