जडेजाची अंपायरकडे तक्रार
साईटस्क्रीनखाली एक माणूस लाल रंगाचा शर्ट घातलेला दिसला. त्याच्या लाल रंगाच्या शर्टमुळे जडेजा विचलित होत होता, पण तो माणूस एक इंचही हलायला तयार नाहीये, असं दिसल्याने जडेजाने अंपायरकडे तक्रार केली. अंपायरने देखील याची दखल घेतली आणि स्टेडियम अंपायरकडे तक्रार कळवली. त्यानंतर प्रेक्षकाला नवीन टी-शर्ट देण्यात आला. प्रेक्षकाने हिरवा टी- शर्ट घातला आणि सामन्याची मजा घेतली.
advertisement
पाहा Video
नाइटवॉचमनची फिफ्टी
ओव्हल येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने महत्त्वाची आघाडी घेतली आहे. यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकासह, आकाश दीप, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकांच्या जोरावर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. नाइटवॉचमन म्हणून आलेला आकाश दीप याने अप्रतिम फलंदाजी करत आपले पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केलं. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही प्रत्येकी 53 धावा करत महत्त्वपूर्ण अर्धशतके झळकावली.
इंग्लंडसमोर 374 धावांचे आव्हान
दरम्यान, सामना जिंकण्यासाठी आणि मालिका बरोबरीत आणण्यासाठी 374 धावांचे आव्हान घेऊन इंग्लंडने आपला दुसरा डाव सुरू केला. सलामीवीर बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी सकारात्मक सुरुवात करत 50 धावांची भागीदारी रचली आणि भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला. मात्र, दिवसाच्या खेळातील शेवटच्याच बॉलवर मोहम्मद सिराजने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. सिराजच्या भेदक यॉर्करने झॅक क्रॉलीला 14 धावांवर बोल्ड केलंय.